Madgaon Parking : मडगावमधील पार्किंग समस्या नेमकी सुटणार कधी?

शहरात रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केल्याने वाहतुकीची होते कोंडी
Madgaon Parking Issue
Madgaon Parking IssueDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : गेल्या 25 वर्षांपासून मडगावात पार्किंग, वाहतूक, गाडेवाले, रस्त्याच्या बाजुने बसणारे गाडेवाले, बेकायदेशीर बांधकामे जशी चालू होती तशीच चालू आहेत. तुलनेने मडगावमधील लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. बाजार, शाळा, सरकारी कचेऱ्या, पेट्रोल पंप, बॅंका सर्वकाही जवळ जवळ 500 मीटर अंतराच्या परिसरात आहे. तसेच नावेली, कोलवा, नुवे, असोळणा, कोलवा, घोगळ, बड्डे, आके या भागातुन मडगाव बाजारात येणाऱ्या लोकांची संख्याही वाढली आहे. त्यातच दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येत भर पडल्याने पार्किंग व्यवस्था कोलमडली आहे.

मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ग्रेस चर्चखाली, नगरपालिकेच्या सभोवताली दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क करण्यासाठीच्या जागा पांढऱ्या रंगाने चिन्हांकित केल्या आहे. तरीही रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करण्याची लोकांची सवय मोडलेली नाही. मडगावमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केली जातात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते.

Madgaon Parking Issue
मोरजीत खड्डे झाले खूप; प्रशासन मात्र चिडीचूप !

काही ठिकाणी नो पार्किंग झोन फलक असतानाही वाहने पार्क केलेली आढळतात. सिटी बसेसही धीम्या गतीने हाकल्या जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. काही ठिकाणी रस्ते अरुंद असल्यामुळेही मडगावात सदैव वाहतुकीची कोंडी झालेली आ्ढळते. पोलिसांकडेही पुरेशी कुमक नसल्याचं उत्तर दिलं जात असल्याने सर्वसामान्य मडगावकर मात्र त्रस्त झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Two Sisters Found Dead in Mokhard
Kapileshwari Kavale Pond Fish Death
Gomantak TV Engineers Excellence Awards
Porvorim Elevated Road Traffic Management
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com