मोरजीत खड्डे झाले खूप; प्रशासन मात्र चिडीचूप !

मोरजीत खड्ड्यात वृक्षारोपण; वाढत्या अपघातांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संताप
Potholes in Morjim Goa
Potholes in Morjim GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी : मोरजी पंचायत क्षेत्रातील मरडीवाडा या मुख्य रस्त्यावर कोको आर्ट गॅलरीजवळ मोठा अन्य खड्ड्यांबरोबरच एक जीवघेणा खड्डा पडलेला आहे. या खड्ड्यांमधून अंदाज न आल्यामुळे अनेकांचे अपघात झाले आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. संतप्त स्थानिकांनी खड्ड्यात वृक्षारोपण करून संताप व्यक्त केला आहे.

मे महिन्यापासून या रस्त्यावर छोटा खड्डा पडला होता. पंधरा दिवसापूर्वी या खड्ड्यांसंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर माजी उपसरपंच अमित शेटगावकर यांनी पुढाकार घेऊन हा खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु धो धो पडत असलेल्या पावसामुळे हा खड्डा पुन्हा एकदा जीवघेणा ठरत आहे. या खड्ड्याच्या बाजूलाच एक हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी दिल्लीतील काही पर्यटक वास्तव्य करून असतात.आणि तेच वाहने या रस्त्याच्या बाजूला ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत. खड्डा चुकवताना वाहनांनाही अपघात घडू शकतात.

दरम्यान, दाभोळकर वाडा ते गावडेवाडा किनाऱ्यापर्यंत जाणारा रस्ताही सध्या धोकादायक स्थितीत आहे. या रस्त्याची चाळण झालेली असून या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे स्थानिकांत संताप आहे. या रस्त्यावरून वाहने चालवणे जिकीरीचे असून जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागतात. यावर त्वरित स्थानिक आमदार जित आरोलकर यांनी लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

Potholes in Morjim Goa
Goa Panchayat Election : पंचायत निवडणुकीसाठी डिचोलीत उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

रात्री अपरात्री घडताहेत अपघात

येथील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत. काल रात्री चारजण येथे अपघातात जखमी झाले होते, त्या जखमींना सोनू शेटगावकर यांनी मदत केली. शिवाय त्यांच्या घराशेजारी असलेले तुळशी वृंदावन वाहनाने मोडून टाकले. या खड्ड्यांमुळे असे अपघात वारंवार घडत आहेत. आणि याकडे पोलिसांचे आणि सार्वजनिक बांधकाम खाते पेडणे विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे लोकांना रात्री अपरात्री जखमींना मदतीसाठी धावत जावे लागते.

रस्ते अगोदरच अरूंद आहेत. त्यात रस्त्यालगतच्या बांधकामांची भर असून संबंधित कंत्राटदार लोकांनी आपल्या ग्राहकांसाठी किंवा रहिवाशांसाठी वाहनांच्या पार्किंगची सोय केलेली नाही. याच खड्ड्याच्या बाजूला जे निवासी घर भाडेपट्टीवर दिलेले आहे. तिथे दिल्लीचे नागरिक राहतात आणि तेच या खड्ड्याच्या बाजूला रस्त्याच्या मधोमध वाहन पार्क करून आणि अपघाताला निमंत्रण देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com