Goa Crime: व्हॉट्स-अ‍ॅपवरून 1 कोटींचा गंडा घातल्या प्रकरणी तीनजणांना अटक; केरळ, आंध्रप्रदेश येथून संशयित ताब्यात

Siolim Digital Arrest Crime: शिवोलीतील बेर्नाडित फर्नांडिस (६८) या महिलेकडून तब्बल १ कोटी रुपये उकळल्‍याप्रकरणी सायबर विभागाने आणखीन तिघांना अटक केली आहे.
Cyber Fraud Goa
Unknown WhatsApp Call Fraud siolimCanva
Published on
Updated on

Fake Crime Branch Officer Fraud Case Cheated Siolim Woman

म्हापसा: अज्ञात व्हॉट्स-अ‍ॅप नंबरवरून काल करून व दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून शिवोलीतील बेर्नाडित फर्नांडिस (६८) या महिलेकडून तब्बल १ कोटी रुपये उकळल्‍याप्रकरणी सायबर विभागाने आणखीन तिघांना अटक केली आहे. संशयित विषक आर. व मोहम्मदशून सुलेमान या दोघांना केरळमधून तर रोशन शेख याला आंध्रप्रदेशमधून ताब्यात घेत अटक केली. यापूर्वी विजयवाडा येथून संशयित यरमला वेंकटेश्‍‍वरलू (५३) याला अटक करण्‍यात आली होती.

याप्रकरणी बेर्नाडित फर्नांडिस या फिर्यादी आहेत. एका अज्ञाताने फिर्यादीच्या मोबाईलवर व्हॉट्स-अ‍ॅप कॉल केला. आपण दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगून ‘तुम्हाला डिजिटल अरेस्ट’ झाल्याचे सांगितले. फिर्यादीच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून मनी लाँड्रिंगझाल्याचे व फिर्यादीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे पत्र आल्याचे सांगितले. तसेच हे प्रकरण मिटवायचे असल्यास विविध बँक खात्यांमध्ये १ कोटी रुपये जमा करण्यास सांगितले.

Cyber Fraud Goa
Goa Crime: कार अडवून चालकास लोखंडी पाईपने मारहाण, दोन लाखांचा ऐवज लंपास; अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद

याप्रकरणी सायबर विभागाने गुन्हा दाखल करून तपास केला असता एसएन पुरम-विजयवाडा येथील एका दागिन्याच्या दुकानाच्या बँक खात्यात ४० लाख रुपये जमा झाल्याचे समोर आले. त्यानुसार सायबर विभागाने विजयवाडा येथून संशयित यरमला वेंकटेश्‍‍वरलू (५३) याला अटक केली. त्यानंतर सायबर विभागाने त्याची कसून चौकशी केली असता,

Cyber Fraud Goa
Goa Crime: बेकायदेशीर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 24 वर्षीय तरुणाला अटक; वास्को पोलिसांची कारवाई

केरळ येथून विषक आर., मोहम्मदशून सुलेमान हे दोघे या प्रकरणात गुंतल्याचे समोर आले. तसेच फिर्यादी महिलेची काही रक्कम वरील संशयितांच्या बँक खात्यात जमा केल्याचे समोर आले. त्यानुसार सायबर विभागाने या दोघांना शनिवारी केरळमधून अटक केली.

या दोघांची व यरमला वेंकटरेश्वरलू याची चौकशी केली असता, यरमलाचे संबंधित बँक खाते रोशन शेख हाताळतअसल्याचे समोर आले. त्यानुसार, संशयित रोशन शेख याला रविवारी आंध्रप्रदेशातून अटक करून गोव्यात आणले. याप्रकरणी आतापर्यंत सायबर विभागाने चौघांना अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com