Passport Renewal: पासपोर्टची मुदत संपण्याआधी 6 महिने नूतनीकरण करा; मडगाव न्यायालयाची अर्जदारांना ताकीद

Madgaon Court Passport Order: पासपोर्टची मुदत संपण्याच्या किमान सहा महिने आधी नूतनीकरणासाठी अर्ज करावा.
Madgaon Court Passport Order
Passport RenewalDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: पासपोर्ट नूतनीकरणासाठी मुदत संपण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहून न्यायालयात अर्ज दाखल करण्याच्या प्रकारांमुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याबद्दल मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सबिनो ब्रागांझा यांनी वकील आणि पक्षकारांना ताकीद दिली आहे.

पासपोर्टची मुदत संपण्याच्या किमान सहा महिने आधी नूतनीकरणासाठी अर्ज करावा. यापुढे शेवटच्या क्षणी दाखल होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि संबंधितांना दंड ठोठावला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. रायबंदर येथील गुन्हे शाखा विरुद्ध अझीम बेग आणि अन्य तिघे या फौजदारी खटल्यात संशयित अझीम बेग यांनी कालबाह्य पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी न्यायालयाची परवानगी मागितली होती.

Madgaon Court Passport Order
Goa Investment Fraud: गोव्यात व्यवसायातील भागीदारीचे आमिष, भोपाळच्या कंत्राटदाराला 3.47 कोटींचा गंडा; श्रीनिवास नायकसह चौघांवर गुन्हा

सर्वोच्च न्यायालयाचे विविध निवाडे आणि केंद्र सरकारच्या २५ ऑगस्ट १९९३ रोजीच्या अधिसूचनेचा विचार करून न्यायालयाने त्यांचा पासपोर्ट दहा वर्षांसाठी नूतनीकरण करण्यास परवानगी दिली. मात्र, अर्जदाराने केवळ पासपोर्ट नूतनीकरणाची परवानगी मागितली असून परदेश प्रवासाची परवानगी मागितलेली नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मुदत संपण्यापूर्वी आवश्यक कार्यवाही न करता शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच बेग यांना विधी सेवा प्राधिकरणाकडे २,५०० रुपये दंड जमा करण्याचा आदेश दिला.

न्यायालयाने घातलेल्या अटी

न्यायालयाने नूतनीकरणासाठी काही अटीही घातल्या आहेत. बेग यांनी अतिरिक्त वैयक्तिक हमीपत्र आणि नुकसानभरपाई हमीपत्रापोटी प्रत्येकी १० हजार रुपयांची हमी सादर करावी. पासपोर्ट प्राधिकरणाने पासपोर्टचे केवळ दहा वर्षांसाठी नूतनीकरण करावे. नवीन पासपोर्ट मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत त्याची नोटरी केलेली प्रत न्यायालयात जमा करावी, असे निर्देश दिले आहेत.

Madgaon Court Passport Order
Goa Film City: गोव्यात फिल्मसिटी उभारणार; जगभरातील चित्रपट निर्मात्यांना मुख्यमंत्र्यांचे चित्रीकरणासाठी आवाहन

न्यायालयाने दिलेले ना-हरकत प्रमाणपत्र केवळ रायबंदर गुन्हे शाखेच्या सध्याच्या गुन्ह्यापुरते मर्यादित राहील. अन्य गुन्हे दाखल असल्यास स्वतंत्र न्यायालयीन परवानगी घ्यावी लागेल. प्रलंबित खटल्याची नोंद पासपोर्ट प्राधिकरणाने आपल्या प्रणालीत करावी. परदेशात प्रवासासाठीही सक्षम न्यायालयाची स्वतंत्र परवानगी बंधनकारक असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.