Stray Dog : भटक्या कुत्र्यांसंदर्भात आवश्यक कृती करा; मडगाव नागरी आरोग्य केंद्राची पालिकेला सूचना

Stray Dog : मडगाव पालिका प्रभाग १६ कालकोंडा येथे तर ही समस्या खूपच वाढलेली आहे. या कुत्र्यांमुळे माणसांनाही रोगांची लागण होण्याची शक्यता वाढली असल्याचे त्यात नजरेस आणून देण्यात आले होते.
stray dog
stray dog Dainik Gomantak
Published on
Updated on

Stray Dog :

मडगाव, साहाय्यक संचालक, पशुवैद्यकीय रुग्णालय, मुख्याधिकारी मडगाव नगरपालिका व आरोग्याधिकारी नागरी आरोग्य केंद्राकडे रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव खूप जास्त प्रमाणात वाढल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून तक्रार करण्यात आली होती.

या प्रकरणी आवश्यक कृती करून त्याची माहिती तक्रारदाराला द्यावी, असे नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मडगाव पालिका मुख्याधिकारी आणि साहाय्यक संचालक, पशुवैद्यकीय रुग्णालय यांना कळविले आहे.

मडगाव परिसरासह सासष्टी तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री फिरत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या भटक्या कुत्र्यांना त्वचेचे आणि इतर अनेक प्रकारचे आजार आहेत.

stray dog
Goa Politicians And Politics: कटाप्पा, सरडा, लापीट, घाबरट! गोव्याच्या राजकारणात उपमांची सरबत्ती

मडगाव पालिका प्रभाग १६ कालकोंडा येथे तर ही समस्या खूपच वाढलेली आहे. या कुत्र्यांमुळे माणसांनाही रोगांची लागण होण्याची शक्यता वाढली असल्याचे त्यात नजरेस आणून देण्यात आले होते.

हे कुत्रे अचानक रस्त्यावर मधोमध धावून येत असल्याने अपघातही घडत असतात आणि वाहनचालकांना तसेच अन्य नागरिकांसाठीही ते त्रासदायक ठरतात. या प्रकरणी लक्ष घालून त्वरित योग्य कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या राजू विर्डीकर यांनी वरील अधिकारिणीकडे केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com