Quepem Lottery Coupons: केपे गणेशोत्सव मंडळाचा राज्यातील नवा विक्रम; एका दिवसात संपली एक लाख लॉटरी कुपन्स

रविवारी झालेल्या गर्दीमुळे कुपन्स विक्री केली होती रद्द
Mad Rush For Lottery On Day Two Follows In Quepem
Mad Rush For Lottery On Day Two Follows In Quepem Dainik Gomantak
Published on
Updated on

Mad Rush For Lottery On Day Two Follows In Quepem: येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवानिमित विक्रीस ठेवलेली एक लाख लॉटरी कुपन्स एका दिवसात विकून संपल्याने हा एकप्रकारे राज्यात आजपर्यंतचा विक्रम ठरला आहे.

सोमवारी (ता.२८) सकाळपासून लोकांनी या लॉटरी कुपन्स खरेदी करण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. रविवारी (ता.२७) अशीच लोकांनी अलोट गर्दी केल्याने कुपन विक्री रद्द करण्यात आली होती.

Mad Rush For Lottery On Day Two Follows In Quepem
Ethan Vaz: गोव्याचा युवा बुद्धिबळपटू एथन वाझची थक्क करणारी भरारी; बुद्धिबळात जबरदस्त सातत्य

दरवर्षी केपे गणेशोत्सव मंडळ आकर्षक बक्षिसे ठेवतात व यावर्षीही मंडळाने सुमारे अडीच कोटी रुपये बक्षिसांवर खर्च केला असून दहा आलिशान चारचाकी वाहने तसेच दहा दुचाकी वाहने बक्षिसे म्हणून ठेवली आहेत.

ही वाहने रस्ता वाहतूक खात्यात नोंद करण्यासाठी तसेच इतर खर्चासाठी वाहनाबरोबर रोख रक्कमही दिली जाणार असल्याने यावर्षी लोकांनी या लॉटरी कुपन्स खरेदीसाठी रविवारी गर्दी केली होती.

त्यावेळी केपे बाजारातील पालिका उद्यानात लोकांनी मोठी गर्दी केल्याने चेंगराचेंगरी होण्याच्या भीतीने लॉटरी कुपन्स विक्री बंद केली होती. सोमवारी सकाळी ८.३० वा. केपे शासकीय महाविद्यालयाच्या सभागृहात कुपन विक्रीला सुरवात करण्यात आली होती. लोक कुपन खरेदी करण्यासाठी पहाटे ४ वा.पासून रांगेत उभे होते.

Mad Rush For Lottery On Day Two Follows In Quepem
गोवा बनणार सर्व गावांमध्ये बँक असलेले राज्य; बँक नसलेल्या 5 गावांमध्ये इंडिया पोस्ट सुरू करणार शाखा

आकर्षक गणपती देखावा

दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकांनी मंडळावर विश्वास ठेवून लॉटरी कुपन्स खरेदी करून मंडळाच्या कार्यात सहभागी झाल्याने लोकांचे आभार मानतो. यावर्षी मंडळ आकर्षक गणपती देखावा सादर करणार असून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

"लोकांची गर्दी पाहून रांगेत असलेल्या सर्वांना आम्ही लॉटरी कुपन देण्याचा प्रयत्न केला आहे व त्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. लोकांची गर्दी पाहता आमच्यावरही बराच दबाव आला होता; पण आम्ही प्रत्येकाला किमान दोनतरी कुपन्स दिली आहेत."

इच्छित फळदेसाई, मंडळाचे अध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com