Ethan Vaz: गोव्याचा युवा बुद्धिबळपटू एथन वाझची थक्क करणारी भरारी; बुद्धिबळात जबरदस्त सातत्य

2100 वरून 2300 एलो गुणांची भन्नाट प्रगती, आयएम नॉर्मची कमाई
Ethan Vaz
Ethan Vaz Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Chess Player Ethan Vaz: गोव्याचा प्रतिभाशाली युवा बुद्धिबळपटू एथन वाझ फक्त अकरा वर्षांचा आहे, मात्र त्याची जागतिक बुद्धिबळ पटावरील भरारी थक्क करणारी आहे.

२१०० एलो गुणांचा टप्पा गाठल्याने ‘फिडे’ने त्याच्या ‘फिडे मास्टर’ किताबावर शिक्कामोर्तब केले, त्यानंतर महिनाभरात त्याने इंटरनॅशनल मास्टर (आयएम) किताबाचा पहिला नॉर्म मिळवत २३०० एलो गुणांचा टप्पा पार करण्याचा भन्नाट प्रगती साधली.

जून महिन्यात एथन नागपूर येथील महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत खेळला. तेथे त्याने २१०० एलो गुणांना गवसणी घातली. त्यामुळे गोवा राज्यातील सर्वांत युवा फिडे मास्टर (एफएम) बनणे त्याला शक्य झाले.

२०२२ साली आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे एथन एफएम किताबासाठी पात्र ठरला होता, पण त्याच्यापाशी आवश्यक एलो गुण नव्हते, ही कमतरता त्याने नागपूरमधील स्पर्धेत भरून काढली.

Ethan Vaz
Teacher Molesting Student: शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; मडकईतील प्रकार

पहिला आयएम नॉर्म

कमी वयात इंटरनॅशनल मास्टर (आयएम) खेळाडू बनण्याचे एथनचे ध्येय आहे. ऑगस्ट महिन्यात अबुधाबी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात या अकरा वर्षीय खेळाडूने ग्रँडमास्टर, आयएम खेळाडूंचा सामना करताना २४८४ गुणांची चमकदार मानांकन कामगिरी बजावली.

तीन ग्रँडमास्टर, चार आयएम खेळाडूंचा सामना करताना नऊ फेऱ्यांतून साडेचार गुणांची कमाई करत आयएम किताबाचा पहिला नॉर्म प्राप्त केला. त्याने २३०० एलो गुणांचा टप्पाही गाठला. अशी कामगिरी करताना तो गोव्यातील युवा बुद्धिबळपटू ठरला.

स्पर्धेत २४ देशांतील १४५ खेळाडूंचा सहभाग होते, त्यात एथनला १३४ वे मानांकन होते. मानांकनाच्या तुलनेत गोव्याच्या या प्रतिभाशाली खेळाडूने खूपच लक्षवेधक खेळ केला.

ब्लिट्झ बुद्धिबळातही दबदबा

केवळ क्लासिकल बुद्धिबळातच नव्हे, तर एथनचा झटपट प्रकारातील ब्लिट्झ बुद्धिबळातही दबदबा राखला आहे. ऑगस्टमध्ये ‘फिडे’ने जाहीर केलेल्या ब्लिट्झ मानांकनात एथनच्या नावे २३७१ एलो गुणांची नोंद झाली.

यामुळे तो १२ वर्षांखालील खुल्या मानांकनात जगात अव्वल बुद्धिबळपटू ठरला, तसेच सबज्युनियर (१५ वर्षांखालील) भारतीय बुद्धिबळपटूंतही तो अग्रमानांकित बुद्धिबळपटू ठरला. १२ वर्षांखालील स्टँडर्ड-क्लासिकल गटात एथन पहिल्या १० खेळाडूंत आहे.

Ethan Vaz
GHRDC Recruitment: कंत्राटी 370 पदांसाठी हजारो युवकांची झुंबड; प्रशासन हतबल

भक्कम पुरस्कर्त्याची गरज

वडील एडविन व आई लिंडा यांचा एथनला बुद्धिबळ प्रगतीत मोलाचे सहकार्य लाभत आहे. युरोपातील, तसेच अबुधाबीतील स्पर्धेसाठी त्याला जीनो फार्मास्युटकल्सचे पाठबळ लाभले.

‘‘एथनने आयएम किताबाचा पहिला नॉर्म मिळवलेला आहे. आणखी दोन नॉर्म आणि २४०० एलो गुणांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला अधिकाधिक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा खेळाव्या लागतील.

युरोपातील स्पर्धा तुल्यबळ असतात, त्यामुळे तेथील स्पर्धांत खेळून एथन लक्ष्यपूर्ती करू शकतो, मात्र त्यासाठी आणखी भक्कम आर्थिक प्रोत्साहनाची गरज असून पुरस्कर्ता मिळाल्यास एथन आणखी वेगाने आगेकूच राखू शकेल याचा पूर्ण विश्वास आहे,’’ असे एडविन यांनी सांगितले.

अबुधाबीतील स्पर्धेत पहिला आयएम नॉर्म प्राप्त केल्यानंतर एथनने सांगितले होते, की ‘‘स्पर्धेसाठी मला पुरस्कृत करणाऱ्या ‘जीनो’प्रती कृतज्ञ आहे. माझे प्रशिक्षक प्रकाश विक्रम सिंग व ग्रँडमास्टर स्वयम मिश्रा, नेहमीच प्रोत्साहन देणारे द किंग्स स्कूल, चेसबेस इंडिया, गोवा बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ, पाठिराखे आणि शुभचिंतक यांचेही मी आभार मानतो.’’

युरोपात अफलातून कामगिरी

जुलै-ऑगस्ट कालावधीत एथन युरोपातील सर्बियात तीन क्लासिकल आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळला. त्याद्वारे त्याने १६९ एलो गुणांची पटकावण्याची अफलातून कामगिरी साधली.

पारासिन ओपन बुद्धिबळ स्पर्धेत त्याने कमालच केली. या स्पर्धेत खेळत असताना त्याने २३३२ लाईव्ह रेटिंग गुणांपर्यंत झेप घेतली होती आणि अखेरीस तो २३०६ एलो गुणांवर स्थिरावला. व्हिएना येथील ऑस्ट्रियन स्पर्धेत एथन लाजबाव ठरला. या स्पर्धेत त्याने २४२७ परफॉर्मन्स रेटिंग नोंदवले.

एथन वाझची आगेकूच दृष्टिक्षेपात

  1. सासष्टीतील राय येथील युवा खेळाडूची भारताचे प्रतिनिधित्व करताना १५ आंतरराष्ट्रीय पदके

  2. राष्ट्रीय पातळीवर ६ पदके, राज्य पातळीवर ५ वेळा विजेता

  3. २०२२ मध्ये श्रीलंकेत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत १२ वर्षांखालील खुल्या गटात सुवर्णपदक विजेता

  4. क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्झ या बुद्धिबळातील तिन्ही प्रकारात आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित खेळाडू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com