Loliem: फिल्‍म सिटी, युनिटी मॉल नकोच! ग्रामसभा तापल्‍या; लोलयेवासीयांचा तिसऱ्या जिल्‍ह्यासह 13 प्रकल्‍पांना विरोध

Goa Gramsabha: फिल्‍म सिटीसह १३ प्रकल्‍प कदापि होता नयेत, अशी एकमुखी मागणी लोलयेवासीयांनी केली; तर वनराई नष्‍ट होण्‍याची भीती व्‍यक्‍त करत चिंबलमध्‍ये प्रस्‍तावित युनिटी मॉलला कडाडून विरोध झाला.
Gramsabha
Goa Panchayat Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी/काणकोण/सासष्‍टी: फिल्‍म सिटीसह १३ प्रकल्‍प कदापि होता नयेत, अशी एकमुखी मागणी लोलयेवासीयांनी केली; तर वनराई नष्‍ट होण्‍याची भीती व्‍यक्‍त करत चिंबलमध्‍ये प्रस्‍तावित युनिटी मॉलला कडाडून विरोध झाला. अगोदर पडताळणी करा, नंतरच घरे भाड्याने द्या, अशा ठरावाद्वारे चिंचोणे ग्रामसभेने आदर्शवत पाऊल उचलले.

राज्‍यात बहुतांश ठिकाणी आज ग्रामसभा झाल्‍या. तेथे स्‍थानिक समस्‍यांवर चर्चा करून एकमुखी ठाम निर्णय घेतले गेले. काणकोण तालुक्याचा समावेश तिसऱ्या जिल्‍ह्यात करू नका, मडगाव हे मुख्यालय सोयीस्कर आहे, असा एकमुखी ठराव लोलये पंचायतीच्या ग्रामसभेत आज घेण्‍यात आला. तसेच फिल्म सिटीसह १३ प्रकल्‍पांना कडाडून विरोध करण्‍यात आला. सुमारे दीडशे ग्रामस्थ या सभेला उपस्‍थित होते.

लोलये पंचायत क्षेत्रात फिल्म सिटीसह सध्‍या १३ प्रकल्प उभारण्याचा प्रयत्‍न स्थानिकांना विश्‍‍वासात न घेता सुरू आहे. प्रामुख्याने दापट येथील निराकार मैदान गोवा क्रिकेट असोसिएशनकडे देण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना या मैदानाचा वापर करण्यासाठी जीसीएला भरमसाठ शुल्क द्यावे लागत आहे. या मैदानाचा ताबा पंचायतीकडे देण्याची मागणी मनोज प्रभुगावकर व त्यांच्या साथीदारांनी केली.

दरम्‍यान, माड्डीतळप व भगवती पठारावरील सर्व प्रस्तावित प्रकल्पांना ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. तसेच तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती करून त्याचे मुख्यालय कुडचडे व अन्य ठिकाणी करण्‍यासही विरोध दर्शविला आहे.

Gramsabha
Goa Filmcity: गोवा फिल्म सिटीच्या नावाखाली 'बाहेरच्या' कलाकारांना, तंत्रज्ञांना प्रस्थापित करण्याची योजना तर नाही ना?

पोलिस पडताळणीअंतीच घरे भाड्याने द्या, चिंचोणेत ठराव

भाडेकरूंच्‍या पडताळणीचा विषय आजच्‍या चिंचोणे-देवसू ग्रामसभेत गाजला. गावात अलीकडे गुन्‍हेगारी वाढली आहे. त्‍यामुळे भाडेकरूंची अगोदर तपासणी व चौकशी करून नंतरच त्‍यांना घरे भाड्याने द्या, असा ठराव ग्रामसभेत घेण्‍यात आला.

बेनी कुतिन्हो यांनी भाडेकरूंच्या तपासणीचा विषय उपस्थित केला. त्यांनी सांगितले की काही घरमालक प्रथम भाड्याने घरे देतात व नंतर तपासणी करतात. अलीकडच्‍या काळात गावात दिवसाढवळ्याही चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. त्‍यावर, सरपंच व्हिएगस म्हणाले की, कुंकळ्ळी पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात येईल. लोकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे.

Gramsabha
Goa Filmcity: काणकोणात सिनेमाचा सेट नको, अभयारण्यच असावे! 'गोवा फिल्मसिटी'मुळे खरा फायदा कुणाला?

तीन वर्षांपासून गावात विजेचा लपंडाव

१. गेल्या तीन वर्षांपासून गावात विजेचा लपंडाव सुरू असून ग्रामस्‍थ त्रस्त झाले आहेत. वीज खात्याकडे तक्रार करुनही काहीच प्रतिसाद मिळत नाही. हा विषय आमदार क्रुझ सिल्वा यांनी विधानसभेत मांडला आहे.

२.जॉन परेरा या ग्रामस्‍थाने सांगितले की, भूमिगत वीजवाहिन्या गरजेच्‍या आहेत. वीज अभियंत्यांनी ग्रामसभेत उपस्थित राहून याबाबत स्पष्टीकरण द्यावे. दरम्‍यान, बेकायदा बांधकामे व रस्त्यावरील गाडेवाल्यांचा प्रश्‍‍नही चर्चेला आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com