Loksabha Election Voting : मतदानामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा टक्का अधिक

Loksabha Election Voting : ६,७,६१५ पैकी ४,६५,८६२ जणींनी बजावले कर्तव्य
Loksabha Election Voting
Loksabha Election VotingDainik Gomantak

अवित बगळे

Loksabha Election Voting :

पणजी, महिला कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत, हे पुन्हा सिद्ध होते. लोकसभा निवडणुकीत ६ लाख ७ हजार ६१५ महिला मतदारांपैकी ४ लाख ६५ हजार ८६२ जणींनी मतदान केले आहे. हे प्रमाण ७६.६६ टक्के आहे.

राज्यभरातील ७५.४२ टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांनी मतदानाचा जास्त टक्केवारीत हक्क बजावल्याचे दिसून येते.

राज्यभराचा विचार केला तर ३४ हजार ७७५ जास्त महिला मतदारांनी पुरुष मतदारांच्या तुलनेत मतदानाचा हक्क बजावला आहे. हे प्रमाण ३.८८ टक्के आहे.

एकूण मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण जास्त आहे. उत्तर गोव्यात महिला मतदारांचे प्रमाण २ टक्क्यांनी तर दक्षिण गोव्यात ६ टक्क्यांनी जास्त आहे. उत्तर गोव्यातील ४ लाख ५१ हजार ४२ मतदारांपैकी २ लाख २९ हजार ९७० महिला मतदार आहेत, तर दक्षिणेत ४ लाख ४५ हजार ९१६ मतदारांपैकी २ लाख ३५ हजार ८९२ महिला मतदार आहेत.

उत्तर गोव्यातील २ लाख २९ हजार ९७० म्हणजेच ७६.९ टक्के महिलांनी मतदान केले आहे. दक्षिण गोव्यातील २ लाख ३५ हजार ८९२ महिला मतदारांनी म्हणजेच ७६.४३ टक्के जणींनी मतदान केले आहे.

Loksabha Election Voting
Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

९० टक्के मतदारसंघात वरचष्मा

राज्यभरातील ४० मतदारसंघांतील ३६ मतदारसंघांत म्हणजे ९० टक्के मतदारसंघांत मतदान केलेल्या महिलांची संख्या ही मतदान केलेल्या पुरुष मतदारांच्या तुलनेत जास्त होती. उत्तर गोव्यातील मांद्रे व पेडणे तसेच दक्षिण गोव्यातील फोंडा व वास्को मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघांत पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त मतदान केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com