Loksabha Election Voting : एकवीस हजार दिव्यांग, ज्येष्ठांचे आजपासून घरातूनच मतदान

Loksabha Election Voting : तीन मेपर्यंत मोहीम : निवडणूक अधिकाऱ्यांची विशेष पथके तैनात
Loksabha Election Voting
Loksabha Election VotingDainik Gomantak

Loksabha Election Voting :

पणजी, लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला अद्याप अवकाश असला तरी दिव्यांग तसेच ८५ वर्षांवरील वृद्धांसाठी मतदानाची सुविधा त्यांच्या घरोघरी उपलब्ध करण्याची मोहीम उद्या २९ एप्रिल ते ३ मेपर्यंत सुरू राहणार आहे.

दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मिळून २०,९२५ मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक पथके मतदानाची जबाबदारी पार पाडणार आहेत.

मतदानासाठी मतदार ओळखपत्र आवश्‍यक असेल. मात्र, जर ते नसल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानासाठी विविध १२ दस्तावेज ओळख पटविण्यासाठी वैध मानण्याचा आदेश जारी केला आहे.

दिव्यांग किंवा ८५ वर्षांवरील मतदारांच्या घरी जाण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक पथके तयार केली आहेत. ठरलेल्या दिवशी व मतदाराला आगाऊ देण्यात माहिती दिल्यानुसार हे पथक मतदाराच्या घरी पोहोचेल.

Loksabha Election Voting
Goa Crime News: व्हिडिओ कॉलवर बोलण्यास पत्नीचा नकार, उत्तर प्रदेशच्या युवकाने गोव्यात उचलले टोकाचे पाऊल

मतदान केंद्रावर ज्याप्रमाणे मतदानासाठी व्यवस्था केली जाते, तशीच मतदाराच्या घरी केली जाईल. मात्र, मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिका असतील. या पथकामध्ये मतदान केंद्र प्रमुख (प्रिझायडिंग ऑफिसर), २ मतदान अधिकारी (पोलिंग ऑफिसर), एक शिपाई आणि एक पोलिस अशा पाचजणांचा समावेश असेल.

मतदानावेळी मतदाराला गरज भासल्यास कुटुंबातील सदस्याला मदत करण्यास परवानगी दिली जाईल. हे पथक जाताना मतदार यादी तसेच मतपेटी घेऊन जातील. मतदान केलेले मत सीलबंद मतपेटीत टाकले जाईल. २ मेपर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल. या मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येतील. या मतदारांचे मतदान १०० न झाल्यास ३ मे हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

...हाही पर्याय खुला

घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध असली, तरीही ज्याला मतदान केंद्रावर ठरलेल्या तारखेनुसार ७ मे रोजी मतदान करायचे असेल, त्यांना पर्याय खुला असेल. हे मतदान कार्यालयीन वेळेत मतपत्रिकाद्वारे केले जाणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com