Loksabha Election : सासष्‍टी तालुक्‍यात चांगली मते पडल्‍यास काँग्रेस बाजी मारणार : क्‍लिओफात कुतिन्‍हो

Loksabha Election : ‍ कॅ. फर्नांडिस यांना मिळत असलेला पाठिंबा पाहिल्‍यास सासष्‍टी तालुक्‍यातील नुवे, बाणावली, वेळ्‍ळी आणि कुंकळ्‍ळी या चार मतदारसंघांत काँग्रेस पक्ष घसघशीत आघाडी घेईल.
Cleophat Coutinho
Cleophat CoutinhoDainik Gomantak
Published on
Updated on

Loksabha Election :

मडगाव, काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीच्‍या युवा नेत्‍यांनी जोर लावल्‍यामुळे दक्षिण गोव्‍यातील वातावरण बदलत चालले आहे.

काँग्रेस पुन्‍हा एकदा दक्षिण गोवा मतदारसंघ स्‍वत:कडे राखून ठेवेल असे वाटू लागले आहे, असे मत ज्‍येष्‍ठ राजकीय समीक्षक ॲड. क्‍लिओफात आल्‍मेदा कुतिन्‍हो यांनी गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना व्‍यक्‍त केले.

ॲड. कुतिन्‍हो म्‍हणाले, काँग्रेसचे युवा नेते अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्‍टन डिकॉस्‍टा, ‘आप’चे आमदार व्‍हेंझी व्‍हिएगस, क्रुझ सिल्‍वा आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी एकत्रित येऊन कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्‍यासाठी काम सुरू केले आहे. याचा सकारात्‍मक परिणाम दिसू लागलाय. सध्‍याच्‍या स्‍थितीत दक्षिण गोव्‍यात काँग्रेसच जिंकेल असे वाटण्‍याजोगी स्‍थिती आहे.

Cleophat Coutinho
Kolhapur-Goa: कोल्हापूरच्या महिलेने पोटच्या मुलीला एक लाख रुपयांना गोव्यात विकले, नोटरीद्वारे झाला व्यव्हार

‍ कॅ. फर्नांडिस यांना मिळत असलेला पाठिंबा पाहिल्‍यास सासष्‍टी तालुक्‍यातील नुवे, बाणावली, वेळ्‍ळी आणि कुंकळ्‍ळी या चार मतदारसंघांत काँग्रेस पक्ष घसघशीत आघाडी घेईल. फातोर्डा, कुडतरी आणि नावेली या तीन मतदारसंघांतही काँग्रेस पक्ष आघाडी घेऊ शकतो. फक्‍त दिगंबर कामत भाजपमध्‍ये असल्‍यामुळे मडगाव मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळू शकणार नाही, असे दिसते.

सासष्‍टी तालुक्‍यात काँग्रेसला मोठी आघाडी मिळाली तर हा पक्ष दक्षिण गोव्‍यातील जागा सहज जिंकू शकेल. तसेच मुरगाव तालुक्‍यातील चारही मतदारसंघांत मागच्‍या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी काँग्रेस पक्षाला चांगली मते मिळण्‍याची शक्‍यता आहे

- ॲड. क्‍लिओफात आल्‍मेदा कुतिन्‍हो, राजकीय समीक्षक

म्‍हणून कॅ. विरियातोंचे पारडे किंचित जड

भाजपच्‍या दक्षिणेतील उमेदवार पल्लवी धेंपे आणि काँग्रेसचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस हे दोन्‍ही उमेदवार उच्‍चशिक्षित आणि चांगल्‍या व्‍यक्तिमत्‍वाचे आहेत. मात्र असे असले तरी कॅ. फर्नांडिस हे पर्यावरण चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते आहेत.

दक्षिण गोव्‍यात कोळसा प्रदूषण हा निवडणुकीसाठीचा मुख्‍य विषय असल्‍याने सर्वसामान्‍य मतदारांचा कल त्‍यांच्‍या बाजूने असू शकतो. त्‍यामुळे त्‍यांचे पारडे किंचित जड वाटते, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com