Loksabha Election Goa : भूतानचे निवडणूक आयुक्त प्रभावित; मतदान प्रक्रियेची पाहणी

Loksabha Election Goa : भारतीय निवडणूक पद्धत आणि सामंजस्य करारावर भाष्य
Loksabha Election Goa
Loksabha Election GoaDainik Gomantak

Loksabha Election Goa :

पणजी, भारतीय निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावरून भूतानच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सोनम टोपगे तसेच त्यांचे पदाधिकारी आणि तेथील पत्रकारही गोव्यात आले असून एका कार्यक्रमात टोपगे यांनी भारतीय निवडणूक पद्धतीविषयी गौरवोद्‌गार काढले. तसेच भारतीय निवडणूक आयोगाबरोबरील सामंजस्य करारावरही भाष्य केले.

भारतासारख्या विशाल व वैविध्यपूर्ण देशाकडून आपल्याला बरेच काही शिकावे लागेल. भूतानसाठी लोकशाही इतिहास हा अल्पकालीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राविषयी त्यांनी भूतानमध्येेही अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याचे सांगितले.

गोव्यात विविध ठिकाणी मतदान केंद्रे वैविध्यपूर्ण व आकर्षकपणे सजविल्याबद्दल टोपगे प्रभावित झाले. भारतीय निवडणूक आयोग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शांततापूर्ण वातावरणात ७५ टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. गोव्यातील तीन दिवसांच्या दौऱ्यातील अनुभवाची त्यांनी माहिती दिली.

यावेळी साहाय्यक मुख्य निवडणूक अधिकारी सपना नाईक बांदोडकर यांनी सर्वांचे स्वागत केले. नोडल अधिकारी ब्रिजेश मणेरीकर यांनी गोव्यातील निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती सादर केली. नोडल अधिकारी संगीता नाईक यांनी आभार मानले.

Loksabha Election Goa
Lok Sabha Election 2024: गोव्यातील दोन लोकसभा जागांसाठी आज मतदान; 16 उमेदवारांचे भवितव्‍य मतदारांच्‍या हाती

‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांमुळे वाढतो विश्‍वास :

मतदाराला आपण केलेल्या मतदानाविषयी खातरजमा करण्यासाठी साहाय्यक ठरणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्राचा भूतानमध्येही वापर करण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला. या यंत्राच्या वापरामुळे भारतीय मतदारांच्या मनात मतदान योग्यरित्या होण्याबाबत विश्‍वास वाढला असल्याचे टोपगे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com