Loksabha Election 2024 : काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन; अर्ज भरण्यापूर्वीच जनतेकडून माझा विजय घोषित : खलप

Loksabha Election 2024 : त्यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहा गीते यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार कार्लुस फेरेरा, ‘आप’चे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर, शिवसेनेचे राज्यप्रमुख जितेश कामत, गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Ramakant Khalap
Ramakant KhalapDainik Gomantak

Loksabha Election 2024 :

पणजी, उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वीच जनतेने मला लोकसभा निवडणुकीत विजयी घोषित केले आहे, असे कॉंग्रेसचे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी सांगितले.

त्यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहा गीते यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार कार्लुस फेरेरा, ‘आप’चे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर, शिवसेनेचे राज्यप्रमुख जितेश कामत, गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी खलप म्हणाले की, गेल्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी अनेकांना जोडत गेलो, ते सारे त्याची आठवण काढत समर्थन देत आहेत. ४०-५० हजारांच्या मताधिक्याने मी जिंकेन, हे आजच स्पष्ट झाले आहे. ढोल-ताशांच्या निनादात कॉंग्रेस हाऊसकडून मिरवणूक काढली.

Ramakant Khalap
Goa BJP slams K'taka CM: 'स्वत:च्या राज्यातील समस्यांकडे लक्ष द्या', गोवा भाजपने सिद्धरामय्यांवर टीका का केली?

लोकसभेत गोव्याचा आवाज पोचला नाही

यावेळी खलप म्हणाले की, मी विजयी झाल्यागत मला कार्यकर्त्यांनी विजयी हार घातला. प्रचार सुरू केल्यापासून जेथे जेथे गेलो, तिथे लोकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देणे सुरू केले आहे. ‘भाई तू पुढे जा’ असे सगळेजण सांगत आहेत.

गेली २५ वर्षे उत्तर गोव्याचा आवाज लोकसभेत पोचलाच नव्हता. त्यामुळे लोक म्हणतात की, आमचा आवाज बनून तुम्ही लोकसभेत जा. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सर्वजातीय लोकांचा पाठिंबा मला मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com