Mapusa News : दोन वर्षांत खाणी पूर्ववत सुरू : अमित शहा

Mapusa News : काँग्रेसवर साधला निशाणा; म्‍हापशात जाहीर प्रचारसभा
Amit Shah
Amit Shah Dainik Gomantak

Mapusa News :

म्हापसा, गोव्‍यातील बंद पडलेला खाणव्यवसाय येत्या दोन वर्षांत पूर्वीप्रमाणेच पूर्ण क्षमतेने सुरू झालेला दिसेल. याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आहे.

कारण ते दहावेळा दिल्लीत आल्याने खाणपट्ट्यांचा लिलाव शक्य झाला आणि पहिल्या खाणीत कामही सुरू होऊ शकले, असे उद्‍गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज म्हापसा येथे भाजपच्या जाहीर प्रचार सभेत काढले. ४ जूननंतर काँग्रेसला ‘काँग्रेस जोडो’ऐवजी ‘काँग्रेस ढूंढो’ यात्रा काढावी लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

Amit Shah
Mysterious Artefact Found In Goa: पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

आपल्या २८ मिनिटांच्या भाषणात शहांनी मोदी सरकारच्या उपलब्धीसह काँग्रेसने विकासाच्‍या राजकारणाऐवजी धर्माचे राजकारण केल्याचा आरोपही केला. भाजपचे उत्तर गोव्यातील उमेदवार श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या प्रचारार्थ ही सभा म्हपशाच्या नव्या बसस्थानकावर घेण्यात आली.

यावेळी व्‍यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह मंत्री, आमदार व पक्षाचे पदाधिकारी उपस्‍थित होते.

शहा म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. सावंत लाजाळू आहेत. ही गोष्ट ते जाहीरपणे सांगणार नाहीत, पण ती सत्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाने राज्यातील खाणकाम बंद पडल्यानंतर ते सुरू करण्यासाठी मार्ग काढणे आवश्यक होते.

मुख्यमंत्री दहावेळा दिल्लीत आले, मला भेटले. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो. त्यातून कायदेशीर मार्ग काढण्यात आला. खाणपट्ट्यांचा लिलाव करणे शक्य झाले. लिलाव झाले आणि एका खाणीतून खाणकामही सुरू झाले. मुख्यमंत्र्यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने हे शक्य झाले. जनतेने आश्‍‍वस्‍त असावे की येत्‍या दोन वर्षांत खाण व्यवसायाला गतवैभव प्राप्त होईल.

भाजपच्या एनडीए आघाडीने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी हा चेहरा दिला. मात्र इंडिया आघाडीकडे तसा चेहराच नाही. काँग्रेसने देशात भारत जोडो यात्रा काढली. परंतु गोव्यात किंवा इतर लहान प्रदेशात काँग्रेसची ही यात्रा गेली नाही. कारण काँग्रेसवाले लहान राज्यांना महत्त्व देत नाहीत.

मात्र गोवा व इतर लहान प्रदेश हे देशाचे हृदय आहेत. मतमोजणीनंतर काँग्रेस अपयशाचे खापर भावा-बहिणीवर (राहुल व प्रियंका) यांच्यावर न फोडता ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर फोडेल.

त्यांना बळीचा बकरा बनवला जाईल. इंडिया आघाडीकडे दूरदृष्टीच नाही. या आघाडीमधील सर्व नेते फक्त आपल्या घराण्याचा व वारसदारांचा विचार करतात. उलट भाजप सरकारला देशाचा विकास साधायचा आहे. तसेच घराणेशाही जपणारे पक्ष देशाचे विकास करू शकत नाही.

काश्‍‍मीर : गोवा का बच्चा बच्चा जान देने के लिए तैयार

भाजप सरकारने ३७० कलम हटवून ‘अखंड भारत’ संकल्पना राबवली. काश्मीर हा देशाचा अविभाज्य घटक असून या काश्मीरसाठी ‘गोवा का

बच्चा बच्चा जान देने के लिए तैयार है’, असे शहा म्हणाले. काँग्रेस काळात देशावर अनेक दहशतवादी हल्ले झाले. परंतु काँग्रेस पक्ष त्यास प्रत्युत्तर देऊ शकला नाही. मात्र मोदी सरकार दहशतवादाला जशाच तसे उत्तर देत आहे. मोदी सरकारच्‍या हातात देश सुरक्षित आहे. म्‍हणूनच भाजपला मतदान करा, असे आवाहन शहा यांनी केले.

सभास्‍थळी ज्‍येष्‍ठाचा मृत्यू

सभेला उपस्थिती लावलेले कुडणे-साखळी येथील बाबुसो उत्तम वेरेकर (६३) या ज्‍येष्‍ठ नागरिकाची तब्‍येत अचानक बिघडली. त्‍यामुळे त्‍यांना जिल्‍हा रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. परंतु तेथील डॉक्‍टरांनी त्‍यांना मृत घोषित केले. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या घटनेबद्दल शोक व्‍यक्त केला.

Amit Shah
Goa News : मुलांना आनंदी वातावरणामध्ये शिकवायला हवे; जयश्री बाविस्कर यांचे प्रतिपादन

देशाला सुरक्षितता देणे हे मोदी सरकारचे प्रथम कर्तव्‍य आहे. समृद्ध, विकसित तसेच देशाची अर्थव्यवस्था उंचावण्यासोबत जगात देशाला नंबर एक बनविण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येणे गरजेचे आहे. त्‍यामुळे मतदारांनी मोठ्या संख्‍येने भाजपला मतदान करावे.

- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com