Mysterious Artefact Found In Goa: पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

Mysterious Artefact Found In Goa: ती मूर्ती किती प्राचीन आहे आणि कशा स्वरूपाची आहे, हे जाणून घेण्यासाठी त्‍या मूर्तीवर कार्बन प्रक्रिया केली जाणार आहे.
Mysterious Artefact Found In Goa
Mysterious Artefact Found In GoaDainik Gomantak

Mysterious Artefact Found In Goa

राजधानी पणजीत काल मंगळवारी ‘हिंदू फार्मसी’जवळ सापडलेली मूर्ती पुरातत्त्व खात्याने आपल्या ताब्यात घेतली आहे.

ती मूर्ती किती प्राचीन आहे आणि कशा स्वरूपाची आहे, हे जाणून घेण्यासाठी त्‍या मूर्तीवर कार्बन प्रक्रिया केली जाणार आहे. अशाच प्रकारच्या दोन मूर्ती शिरदोन येथे असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.

काल सापडलेली मूर्ती कुठे ठेवावी याबाबत सरकार निर्णय घेणार असून निवडणुकीनंतर त्यासंबंधीचा प्रस्ताव पुरातत्त्व खाते सरकारकडे पाठविणार आहे, असे पुरातत्त्व खात्याचे संचालक नीलेश फळदेसाई यांनी ‘गोमतन्क’ला सांगितले.

दुसरीकडे इतिहासप्रेमी आणि संशोधक संजीव सरदेसाई म्हणाले की, ही मूर्ती सतराव्या शतकातील असण्याची शक्यता आहे. या मूर्तीमध्ये एक व्यक्ती ‘हार्प’ हा पाश्चात्त्य तंतुवाद्याचा प्रकार वाजवताना दिसतेय आणि तिच्‍या पायाजवळ एक श्‍‍वान आहे. अशीच मूर्ती शिरदोन गावातील एका हॉटेलनजीक आहे. तसेच आणखी एका ठिकाणी अशी मूर्ती मी पाहिली आहे, असे सरदेसाई म्‍हणाले.

Mysterious Artefact Found In Goa
Goa Congress: पर्रीकरांनी विश्वास घातकी म्हटले त्याच गॉडमनला भाजपात प्रवेश; मोदी परिवारात देशद्रोही लोक - पाटकर

पाटो पुलाच्‍या कामावेळीही सापडले होते भग्‍नावशेष

स्व. मनोहर पर्रीकर जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा पाटो पुलाचे काम हाती घेण्यात आले. त्‍यावेळी झालेल्‍या उत्‍खननावेळी असे भग्नावशेष व मूर्ती सापडल्‍या होत्‍या. या मूर्ती नंतर वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आल्या. आता जी मूर्ती सापडली आहे, तिचे जतन करण्‍याबरोबरच अधिक माहिती मिळविण्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे, असे संजीव सरदेसाई म्‍हणाले.

पोर्तुगीजांनी आपली राजधानी जुने गोवे सोडून ती पणजी करावयाची ठरवली, तेव्हा तेथून कित्येक मूर्ती, दगड पणजीत आणले. या मूर्ती, दगड कालांतराने भूमातेच्या उदरात गडप झाल्‍या. आता उत्‍खनन होते, तेव्‍हा अशा गोष्टी उजेडात येतात.

- संजीव सरदेसाई, इतिहासप्रेमी-संशोधक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com