Madgaon Constituency : मडगाव मतदारसंघात भाजपचे १८ हजार मतांचे लक्ष

Madgaon Constituency :आमदार दिगंबर कामत सक्रिय; मतभेद विसरून एकत्र येण्याचा प्रयत्न
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Dainik Gomantak

Madgaon Constituency :

सासष्टी, या वेळेच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठीनी प्रत्येक आमदाराला अमूकच मतांचे लक्ष्य दिले आहे.

मडगावातही १८ हजार मतांचे लक्ष्य दिल्याचे व हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आमदार दिगंबर कामत कसोशीने प्रयत्न करीत आहेत, असे पक्षाच्या खात्रीलायक गोटातून कळते. मडगावमधील भाजपचे कार्यकर्ते आपसातील मतभेद, दुजाभाव विसरून पक्षाला मोठे मताधिक्य मिळवून देण्याच्या प्रयत्नांत आहेत.

त्यांनी हल्लीच मोती डोंगरावर ‘इज्जत का सवाल’ आहे, असे म्हटले होते. इतरत्र ‘ओव्हर कॉन्फिडन्स, गाफिल’ राहू नका, असा सल्ला ते कार्यकर्त्यांना देतात, ते याचसाठी. शिवाय पक्ष श्रेष्ठींनी दिलेले लक्ष्य पूर्ण झाले नाही, तर स्वतःचे भविष्य अबाधित राहील काय? याबाबतही धाकधूक त्यांना आहे, असे बोलले जाते.

मडगावात भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील मतांची संख्या पाहता सरासरी ११ ते १२ हजार मते आहेत. २०१४ साली नरेंद्र सावईकर जिंकले होतेस, तेव्हा एकूण २०९४५ मतांपैकी १०१९८ मते पडली होती. तेव्हा आताचे भाजपात प्रवेश केलेले कॉंग्रेसचे आमदार दिगंबर कामत पक्षात नव्हते. कॉंग्रेसला ९०७० मते पडली होती. २०१९ साली एकूण २११४० मतांपैकी भाजपला ९०४६ व कॉंग्रेसला ११०८२ मते पडली होती.

Loksabha Election 2024
Goa Politicians And Politics: कटाप्पा, सरडा, लापीट, घाबरट! गोव्याच्या राजकारणात उपमांची सरबत्ती

गेली ३० वर्षे दिगंबर कामत आमदार आहेत. मध्यंतरी ते पाच वर्षे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी स्वतःची ८ हजार मते होती. मोती डोंगरावर २५०० मतदान होत असते, हीसुद्धा मते कामत भाजपच्या झोळीत आणू शकतात. त्यामुळे भाजपची १० व कामत यांची ८ मिळून १८ हजार मते भाजपसाठी अपेक्षित असल्याचे बोलले जाते.

मडगावात सरासरी ७० टक्के मतदान होत असते. सध्या मडगावात एकूण मतदारांची संख्या आहे ३००७२. त्यामुळे यावेळी मतदान २१ ते २२ हजार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कॉंग्रेसची मडगावात साडेतीन ते चार हजार मते आहेतच. त्यामुळे दिगंबर कामत स्वतःची म्हणून असलेल्या मतांपैकी नेमकी किती मते भाजपसाठी परिवर्तीत करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com