FC Goa: लोकेश भेरवानी एफसी गोवाचे नवे फुटबॉल संचालक

रवी पुस्कूर यांना सीईओपदी बढती मिळाल्यानंतर रिक्त झाली होती जागा
Lokesh Bherwani
Lokesh Bherwani Dainik Gomantak
Published on
Updated on

FC Goa News: एफसी गोवा संघाच्या फुटबॉल संचालकपदी लोकेश भेरवानी यांची नियुक्ती झाली. रवी पुस्कूर यांना मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) बढती मिळाल्यानंतर रिक्त झालेल्या जागी लोकेश यांची वर्णी लागली.

Lokesh Bherwani
Asian Games 2023: 'करो या मरो' सामन्यात भारत जिंकला, सुनील छेत्रीचा जलवा पुन्हा दिसला!

एफसी गोवा क्लबच्या धोरणात्मक वाटचालीत फुटबॉल कार्यवाही आणि देशातील फुटबॉलमध्ये क्लबचे स्थान अधिक मजबूत करण्याची जबाबदारी लोकेश यांच्यावर असेल. फुटबॉल संचालक ही जबाबदारी मिळण्यापूर्वी लोकेश एफसी गोवा संघात सहा वर्षांहून अधिक काळ खेळाडू निवड प्रक्रियेत वरिष्ठ व्यवस्थापक होते.

एफसी गोवाचा आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील 2023-24 मधील मोसमाची सुरवात दोन ऑक्टोबरपासून होईल. त्यांचा पहिला सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पंजाब एफसी संघाविरुद्ध होईल.

Lokesh Bherwani
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अचानक केला मोठा बदल, 'या' दिग्गजाची टीममध्ये झाली एन्ट्री!

‘‘लोकेश यांना क्लबच्या अंतर्गत कामकाजाची खोलवरची समज आहे. एफसी गोवाच्या युवा विकास कार्यक्रमापासून मुख्य संघापर्यंत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. ज्यामुळे त्याची फुटबॉल संचालकपदावर पदोन्नती झाली,’’ असे एफसी गोवाचे सीईओ रवी पुस्कूर यांनी सांगितले.

‘‘भेरवानी यांचा क्लबसोबतचा व्यापक अनुभव आणि ज्ञान पाहता, फुटबॉल संचालक म्हणून येणाऱ्या जबाबदाऱ्यांशी ते लगेच जुळवून घेतील, यात मला कुठलीही शंका नाही. मैदानावर सतत कार्यरत राहण्याच्या त्यांच्या क्षमतेचा क्लबला अनेक प्रकारे फायदा होईल,” असे पुस्कूर पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com