Royal Challengers Bangalore
Royal Challengers Bangalore Dainik Gomantak

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अचानक केला मोठा बदल, 'या' दिग्गजाची टीममध्ये झाली एन्ट्री!

Royal Challengers Bangalore Women's Premier League: आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाला अद्याप एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही.
Published on

Royal Challengers Bangalore Women's Premier League: आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाला अद्याप एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. अशा परिस्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2024 साठी आधीच तयारी सुरु केली आहे.

आरसीबीने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल केले आहेत. फ्रेंचायझीचे संघ संचालक माईक हेसन आणि मुख्य प्रशिक्षक संजय बांगर संघापासून वेगळे झाले आहेत.

त्याचवेळी, महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पुढील हंगामापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपले मुख्य प्रशिक्षक बदलले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नवे मुख्य प्रशिक्षक

महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रापूर्वी ऑस्ट्रेलियाचा (Australia) ल्यूक विल्यम्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चे मुख्य प्रशिक्षक म्हणून सामील होणार आहे. ESPNcricinfo च्या मते, पहिल्या हंगामातील आरसीबीच्या खराब कामगिरीनंतर विल्यम्स न्यूझीलंडच्या बेन सॉयर यांची जागा घेतील.

Royal Challengers Bangalore
IPL: सनरायझर्स हैदराबादने सोडली ब्रायन लाराची साथ, आता RCB चा जुना शिलेदार झाला 'हेड कोच'

पहिल्या हंगामात संघ अपयशी ठरला

पहिल्या हंगामात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघ खेळला होता. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी, न्यूझीलंडची (New Zealand) सोफी डिव्हाईन आणि इंग्लंडची हीथर नाईट यासारखे स्टार खेळाडू असूनही आरसीबी पाच संघांच्या स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिला. आरसीबीला आठ सामन्यांत केवळ दोन विजय नोंदवता आले.

Royal Challengers Bangalore
IPL in Theatres: आता थिएटरमध्ये पाहाता येणार क्रिकेट सामने? तमिळनाडू सरकारला साकडे

ल्यूक विल्यम्स

ल्यूक विल्यम्सने महिला बिग बॅश लीगमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्सचे प्रशिक्षकपद भूषवले आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने 2022-23 हंगामात विजेतेपद पटकावले होते.

यापूर्वी दोनदा उपविजेतेपदही भूषवले होते. द हंड्रेड वुमेन्स कॉम्पिटिशनमध्ये ते सहाय्यक प्रशिक्षक होते आणि विजेतेपद विजेत्या सदर्न ब्रेव्ह या संघाशी संबंधित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com