Lok Sabha Election Goa: ठरलं...दोन दिवसांत उमेदवारी निश्चित होणार!

Lok Sabha Election Goa: लोकसभेसाठी दोन्ही पक्षांचे धोरण : राजकीय नेते लागले कामाला
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionDainik Gomantak

Lok Sabha Election Goa: भाजप आणि काँग्रेस या राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवार निश्चितीला आता गती दिली आहे.

येत्या दोन दिवसांत या दोन्ही पक्षांचे लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार निश्चित होणार असल्याची माहिती खात्रीलायकरित्या मिळाली आहेत.

रिव्हॉल्युशनरी गोवन्स या पक्षाने उत्तर व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे मनोज परब आणि रुबर्ट परेरा यांची उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे.

भाजपने उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची उमेदवारी कायम ठेवली आहे.

काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षाची आघाडी राज्य स्थापन केल्यानंतर उमेदवारांच्या नावांविषयी नव्याने विचार करणे सुरू केले आहे. काँग्रेसचे राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी यासंदर्भात विविध पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे.

भाजपने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले आहे. त्यांची आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण असावा, याविषयीचे नाव निश्चित केले जाणार आहे.

Lok Sabha Election
Jelly Fish In Goa: ऐन हंगामात मच्छीमारांसमोर 'नवं संकट', बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवण्याची आलीय वेळ, वाचा सविस्तर...

सोमवारचा मुहूर्त साधणार:-

भाजप आपल्या उमेदवारांची दुसरी यादी उद्या रविवारी तर काँग्रेसकडून आपल्या उमेदवारांची यादी सोमवारी रात्री उशिरा किंवा मंगळवारी सकाळी जाहीर केली जाणार आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत गोव्यातील उमेदवारांना स्थान दिले नव्हते.

पुन्हा सावईकरांचा विचार:-

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून भाजपने महिला उमेदवाराला उमेदवारी देण्याचे संकेत यापूर्वी दिले होते.

माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक आणि माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या नावासह नव्याने शोध घेतलेल्या महिला नेत्यांच्या नावांचा विचार उमेदवारीसाठी केला जाणार आहे, अशी सावध भूमिका भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी घेतली होती.

महिला उमेदवारांची संभाव्य नावे दिल्लीला कळविल्यानंतर आता पुन्हा ॲड्. सावईकर यांच्या नावाचा विचार सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शेफालीच्या नावावर चर्चा नाही:-

कुंकळ्ळी येथील शेफाली वैद्य यांच्या नावाचा पक्ष विचार करीत आहे किंवा त्यांच्या नावाची चर्चा झाली यात तथ्य नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केले. शेफालीचे नाव कुणी पुढे केले कळत नाही.

मात्र, अन्य काही महिलांच्या नावांवर चर्चा झाली, असे सांगून त्यांची नावे सांगण्यास नकार दिला. संभाव्य महिला उमेदवारांची नावे येत्या एक-दोन दिवसांत पक्षश्रेष्ठींना पाठवली जातील.

दक्षिण गोव्याचा उमेदवारही दोन-तीन दिवसांत जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com