सप्तकोटीश्वराचे दर्शन हा भाग्याचा क्षण: तेजस्वी सूर्या

राष्ट्रीय युवा संसदेच्या उदघाटनानिमित्त गोव्यात आलेल्या तेजस्वी सूर्या यांनी गुरुवारी सायंकाळी श्री सप्तकोटीश्वर मंदिराला भेट देऊन श्री सप्तकोटीश्वर देवाचे दर्शन घेतले.
Lok Sabha MP Tejaswi Surya 
Visited historic temple in goa
Lok Sabha MP Tejaswi Surya Visited historic temple in goa

डिचोली: छत्रपती शिवाजी महाराज यांनी जीर्णोद्धार केलेल्या नार्वेतील ऐतिहासिक श्री सप्तकोटीश्वर मंदिर आणि देवाचे दर्शन घेण्याचा योग, हा आपल्यासाठी भाग्याचा क्षण आहे. असे भावनात्मक उद्गार भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी काढले.

Lok Sabha MP Tejaswi Surya 
Visited historic temple in goa
काँग्रेस-राष्ट्रवादीचे ठरले! गोव्यातही महाविकासआघाडीचे वाहू लागले वारे

राष्ट्रीय युवा संसदेच्या उदघाटनानिमित्त गोव्यात आलेल्या तेजस्वी सूर्या यांनी गुरुवारी सायंकाळी श्री सप्तकोटीश्वर मंदिराला भेट देऊन श्री सप्तकोटीश्वर देवाचे दर्शन घेतले. नंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना वरील उद्गार काढले. पुरातत्व खात्यातर्फे सध्या श्री सप्तकोटीश्वर मंदिराचे सौं सौंदर्यीकरण काम चालू आहे. या कामाबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले. मयेचे आमदार प्रवीण झाट्ये यांनी तेजस्वी सूर्या यांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, भाजपच्या प्रदेश सरचिटणीस आरती बांदोडकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष अंकिता न्हावेलकर, मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कार्बोटकर, चोडणचे सरपंच कामलाकांत वाडयेकर, वन-म्हावळींगेची सरपंच शीतल सावळ, पिळगावची उपसरपंच उर्मिला प्रभूगावकर,नार्वेची पंच प्रतिष्ठा मिशाळ, मयेची पंच ऊर्वी मसूरकर, विश्वास चोडणकर मये भाजयुमो अध्यक्ष राजाराम च्यारी आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com