काँग्रेस-राष्ट्रवादीचे ठरले! गोव्यातही वाहू लागले महाविकासआघाडीचे वारे

गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये धुसफूस तसेच अंतर्गत लाथाळ्या सुरू आहेत. त्याचा फायदा काँग्रेस पक्ष उठवण्याचा प्रयत्न करत आहे.
Congress and NCP alliance talks begin in Goa
Congress and NCP alliance talks begin in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये धुसफूस तसेच अंतर्गत लाथाळ्या सुरू आहेत. त्याचा फायदा काँग्रेस पक्ष उठवण्याचा प्रयत्न करत आहे. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या निर्देशानुसार गोव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युतीसंदर्भात बोलणी सुरू झाली आहे. मात्र, अजूनही गोवा फॉरवर्ड किंवा मगो पक्षाने युतीसाठी प्रस्ताव ठेवलेला नसला तरी ते चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भाजपविरोधात महाआघाडी स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहेत.

राज्यातील भाजप सरकारला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्रित येण्याची गरज आहे. त्यासाठी समविचारी पक्षांनी पुढाकार घेणे सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार तसेच ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधून गोव्यातील युतीबाबत चर्चा केली. त्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटले. एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची गुप्त बैठक झाली. यावेळी प्राथमिक चर्चा झाली असली तरी त्यावरील निर्णय पक्षाची केंद्रीय समिती घेणार आहे.

Congress and NCP alliance talks begin in Goa
‘आप’च्या निर्णयाचा प्रस्थापित पक्षांना ताप

8 आमदारांना नको भाजपची उमेदवारी

भाजपचे अनेक आमदार नाराज आहेत. 8 आमदारांना भाजपच्या तिकिटावर जिंकण्याची खात्री नाही. त्यामुळेच त्यांनी भाजपच्या तिकिटावर आगामी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे चोडणकर म्हणाले.

‘आप’ हा भाजपने मतविभागणीसाठी राज्यात आणलेला पक्ष आहे. काँग्रेसची मते फोडण्याचे काम भाजपला जमत नाही. ते आप करणार आहे. पण ‘आप’ने कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नाही.

- गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस

Congress and NCP alliance talks begin in Goa
चर्चिल यांच्या राजकीय अपत्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली मूठमाती

पी. चिदंबरम, दिनेश गुंडू राव आज गोव्यात

राज्यात मोठ्या घडामोडी सुरू असल्याने काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम आणि गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव हे आज गोव्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसशी बोलणी सुरू आहे. त्याचाही आढावा ते घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या उपस्थितीत कळंगुट व पणजी गट काँग्रेसची बैठक होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com