Amit Shah In Goa: भाऊंसाठी म्हापशात ‘शाही’ सभा; 25 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता

Mapusa Amit Shah Meeting : या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी जिल्हा प्रशासन, पोलिस, सुरक्षा यंत्रणा तसेच पक्षातर्फे सभेच्‍या स्‍थळाची संयुक्त पाहणी करण्‍यात आली. तसेच सभेच्या तयारीचा आढावा घेण्‍यात आला. या सभेला २० ते २५ हजार लोक येण्‍याची शक्‍यता आहे.
Mapusa Amit Shah Meeting
Mapusa Amit Shah Meeting Dainik Gomantak

Mapusa Amit Shah Meeting :

म्हापसा येथील नवीन कदंब बसस्थानकावर उद्या शुक्रवारी ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता भाजपतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर प्रचारसभा आयोजित करण्‍यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी जिल्हा प्रशासन, पोलिस, सुरक्षा यंत्रणा तसेच पक्षातर्फे सभेच्‍या स्‍थळाची संयुक्त पाहणी करण्‍यात आली. तसेच सभेच्या तयारीचा आढावा घेण्‍यात आला. या सभेला २० ते २५ हजार लोक येण्‍याची शक्‍यता आहे.

Mapusa Amit Shah Meeting
Aryan Khan Goa Shoot: एसआरकेच्या लेकाचं गोव्यात 'स्टारडम' शूट; अभिनेत्री मोना सिंगही साकारणार भूमिका

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दक्षिण गोव्‍यात सांकवाळ येथे सभा झाली होती. त्‍या सभेला सुमारे ५० हजार लोकांची उपस्‍थिती होती. त्‍या सभेद्वारे भाजपने लोकसभा निवडणुकीच्‍या प्रचारात आघाडी तर घेतलीच शिवाय वातावरण निर्मिती करण्याचाही प्रयत्न केला.

म्‍हापसा कदंब स्थानकावरील जागेचा विचार करता शहांच्‍या उद्याच्‍या सभेला २५ हजार लोक येऊ शकतात. मात्र एवढ्या गर्दीला ही जागा अपुरी पडू शकते. तरीसुद्धा सभेला मोठी गर्दी खेचण्‍यासाठी भाजपचे आमदार, मंत्री व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. गोव्‍यात लोकसभेसाठी ति‍सऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होत आहे.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्‍यांच्‍या प्रचारार्थ २४ एप्रिलला म्हापशात अमित शहांची जाहीर सभा होणार होती. परंतु शेवटच्या क्षणी ती पुढे ढकलण्यात आली होती. आता ही सभा उद्या शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता होत आहे.

कडेकोट बंदोबस्त

शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता सभेला सुरूवात होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राचा दौरा करून गोव्यात दाखल होतील. मोपा विमानतळावर उतरल्यानंतर शहांचा ताफा रस्त्यामार्गे म्हापसा केटीसी बसस्थानकावर पोहोचेल.

सायंकाळी सातपर्यंत ते सभास्‍थळी पोहोचण्याची शक्‍यता आहे. दरम्‍यान, गोवा पोलिसांचे ५०० कर्मचारी गणवेशात, २०० पोलिस साध्या वेशात सभास्थळी तैनात असतील. शिवाय मोपा विमानतळ ते सभास्थळापर्यंतच्या रस्त्यावर अतिरिक्त २०० पोलिस तैनात केले जाणार आहेत. सीआरपीएफ जवानांचाही बंदोबस्‍त असेल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय व सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत आम्‍ही तयारीचा आढावा घेतला. सभेला २० ते २५ हजार लोकांची उपस्थिती असेल. गोवा पोलिसांसह सीआरपीएफ जवानांचेही सभास्थळी सुरक्षाकवच असेल.

- सिद्धार्थ कुंकळ्येकर, माजी आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com