Lok Sabha Election 2024: मडकई मतदारसंघ मगोचा बालेकिल्ला; सुदिन ढवळीकरांचा भाजपला 'हात'

Marcaim Constituency: मडकई मतदारसंघ हा मगोचा बालेकिल्ला. १९६३ ते आजपर्यंत हा मतदारसंघ मगोपच्या ताब्‍यात राहिला आहे.
Sudin Dhavalikar
Sudin Dhavalikar Dainik Gomantak
Published on
Updated on

Marcaim Constituency: मडकई मतदारसंघ हा मगोचा बालेकिल्ला. १९६३ ते आजपर्यंत हा मतदारसंघ मगोपच्या ताब्‍यात राहिला आहे. अपवाद फक्त १९९४चा. त्यावर्षी मगो-भाजपची युती असल्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला होता आणि त्यामुळे भाजपचे श्रीपाद नाईक हे पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले होते.

मडकई हा तसा ग्रामीण मतदारसंघ. या मतदारसंघात एकूण सहा पंचायती येतात. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून मगोचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांनी दहा हजारांहून अधिक मताधिक्‍य घेऊन विजय प्रात केला होता. भाजपचे सुदेश भिंगी यांना ४००० मते मिळाली होती. त्यामोगामाग तिसरा क्रमांक ३४८८ मते घेणाऱ्या आरजी पक्षाचा लागला होता. तर, काँग्रेसच्या लवू मामलेदार यांना १०९०, राष्ट्रवादीचे रवींद्र तळावलीकर यांना १४० तर ‘आप’ला ४१९ मते प्राप्त झाली होती. या तिन्ही पक्षांची ही मते एकत्रित केल्यास बेरीज होते १६४९. यातून काँग्रेसचे या मतदारसंघात नेटवर्क नसल्याचे दिसून येते. त्याचबरोबर ‘आप’चाही विशेष प्रभाव दिसत नाही. हे पाहता विरोधकांची एवढीच शक्ती सध्या तरी या मतदारसंघात प्रत्ययाला येते.

Sudin Dhavalikar
Lok Sabha Election 2024: गोव्यातील इंडियन रिझर्व्ह बटालियनचे 920 पोलिस मतदानापासून राहणार वंचित?

विशेष म्हणजे, मागच्या लोकसभा निवडणुकीत सुदिन ढवळीकर हे काँग्रेसच्या बाजूने असूनही भाजपने या मतदारसंघात आघाडी घेतली होती. आणि यावेळी सुदिन ढवळीकर भाजपच्या बाजूने असल्यामुळे ही आघाडी अधिक फुगण्याची शक्यता आहे. पण यात सध्या भर पडली आहे ती बहुजन समाज पक्षाच्या (बसप) डॉ. श्‍वेता गांवकर यांची. डॉ. गावकर या मडकई मतदारसंघाच्या माजी आमदार कै. बाबुसो गावकर यांच्या स्नुषा असल्यामुळे त्यांना बाबुसोंच्या पुण्याईचा थोडा फार फायदा होऊ शकतो. बाबुसो गावकर दोन वेळा मडकईतून निवडून आल्यामुळे त्यांना मानणारे मतदार अजूनही या मतदारसंघात आहेत. त्याचा फायदा घेऊन डॉ. गावकर सुदिन यांच्या मतपेढीला छेद देतात की काय, हे बघावे लागेल.

Sudin Dhavalikar
Lok Sabha Election 2024: भाजपचा प्रचाररथ 'सुसाट'; 3 तारखेला अमित शाह यांची गोव्यात धडाडणार तोफ

भाजपला १० ते १२ हजारांचे मताधिक्‍य शक्‍य

एकंदरीत विचार करता हा मतदारसंघ संपूर्णपणे भाजपच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. सासष्‍टीतल्या मतदारसंघातून काँग्रेसला मिळू शकणारी आघाडी कमी करण्यात हा मतदारसंघ मोलाचा वाटा उचलू शकतो. अर्थात फोंड्याप्रमाणे या मतदारसंघातही ‘सायलंट व्होटर्स’ असून सुदिन ढवळीकर रिंगणात नसल्यामुळे ते कोणाच्या बाजूने कौल देतात हेही बघावे लागेल. अशा काही विरोधी बाजू असल्या तरी या मतदारसंघाचा कानोसा घेतल्यास मगोच्या वर्चस्वामुळे भाजप या मतदारसंघात मुसंडी मारू शकतो असा निष्कर्ष काढता येतो. सध्याची परिस्थिती पाहता या मतदारसंघातून भाजप १० ते बारा हजार मतांची आघाडी प्राप्त करण्याचे संकेत मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com