Lok Sabha Election 2024: इंडिया अलायन्स सरकार स्थापन होताच 30 लाख सरकारी नोकऱ्या देणार: एल्टन डिकॉस्‍टा

Altone D'Costa: केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्‍यानंतर बेरोजगारी कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने तब्‍बल ३० लाख सरकारी नोकऱ्या उपलब्‍ध करून देण्‍यात येतील.
Altone D'Costa
Altone D'CostaDainik Gomantak

Lok Sabha Election 2024: ‘युवा न्याय’ हा काँग्रेसचा सर्वसमावेशक उपक्रम देशातील युवकांसाठी आशेचा किरण आहे. पक्षाचा जाहीरनामा युवकांच्या आशा-आकांक्षा आणि उपजीविकेतील समस्यांचे निराकरण करणारा आहे. केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्‍यानंतर बेरोजगारी कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने तब्‍बल ३० लाख सरकारी नोकऱ्या उपलब्‍ध करून देण्‍यात येतील, असे काँग्रेसचे दक्षिण गोवा निवडणूक समन्वयक तथा केपेचे आमदार एल्टन डिकॉस्‍टा यांनी प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे.

दरम्यान, या नोकरभरतीत पारदर्शकता आणि सुलभता असेल. कोठेही भ्रष्‍टाचाराला थारा दिला जाणार नाही. व्यावहारिक अनुभवाचे महत्त्व ओळखून काँग्रेस पक्ष सर्व शिक्षित युवकांना एक वर्षाचे प्रशिक्षण देणारी एक महत्त्वाची योजना आणणार आहे. त्‍यात प्रशिक्षणार्थी युवकांना प्रतिवर्ष एक लाख रुपये देण्यात येतील. हा उपक्रम केवळ आर्थिक साहाय्यच प्रदान करणार नाही तर युवकांना मौल्यवान कौशल्ये आणि त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी संधी उपलब्ध करणार आहे, असे डिकॉस्‍टा यांनी पत्रकात म्‍हटले आहे.

Altone D'Costa
Lok Sabha Election 2024: भाजपचा प्रचाररथ 'सुसाट'; 3 तारखेला अमित शाह यांची गोव्यात धडाडणार तोफ

पेपरफुटी रोखण्‍यासाठी करणार सक्षम कायदा

पेपरफुटी हा प्रकार निष्पक्ष आणि गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रियेत अडथळा ठरत आहे. काँग्रेस पक्षाने त्‍याला आळा घालण्‍यासाठी कठोर कायदा करून निर्णायक पाऊल उचलले आहे. त्‍यामुळे पारदर्शक परीक्षा पद्धत तयार होऊन सर्व उमेदवारांसाठी गुणवत्तेवर आधारीत संधी मिळणार आहेत, असे डिकॉस्‍टा यांनी पत्रकात नमूद केले आहे.

५ हजार कोटींचा स्टार्ट-अप निधी

युवकांमध्ये उद्योजकतेच्या भावनेला बळ देण्यासाठी काँग्रेस ५ हजार कोटींचा स्टार्ट-अप निधी देणार आहे. हा फंड नवकल्पना आणि वाढीसाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल. युवा उद्योजकांना त्यांची स्वप्ने साकार करण्यास सक्षम करेल आणि भारताच्या आर्थिक प्रगतीत योगदान देईल, असेही डिकॉस्‍टा यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com