Anjuna Resident Protest
Anjuna Resident Protest Dainik Gomantak

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Anjuna Noise Pollution: मेगा इव्हेंट्सना दिलेली परवानगी मागे घ्यावी, यासाठी स्थानिकांच्या एका गटाने हणजूण-कायसूव पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
Published on

Anjuna Villagers Protest Against Mega Events Noise Pollution

म्हापसा: मेगा इव्हेंट्सना दिलेली परवानगी मागे घ्यावी, यासाठी शुक्रवारी (ता.२२) स्थानिकांच्या एका गटाने हणजूण-कायसूव पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

अशा इव्हेंट्समुळे ध्वनी प्रदूषणात भर पडते. असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. ध्वनी प्रदूषण करणारे इव्हेंट्स गावात नको, या आशयाचे फलक आंदोलनकर्त्यांच्या हाती होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा लक्षणीय सहभाग होता.

मेगा इव्हेंट्सना परवानगी देण्यापूर्वी पंचायतीने लोकांना विश्वासात घ्यावे. सध्या वागातोर येथे मोटारबाईक इव्हेंट होत आहे. पोलिस, पंचायत किंवा ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस भूमिका घ्यावी.

Anjuna Resident Protest
Anjuna Noise Pollution: बंदिस्त पब्समधील ‘संगीत’ तपासा; हायकोर्ट पुन्हा सख्त; कारवाई रिपोर्ट सादर करण्याचे पोलिसांना निर्देश

ध्वनी बंदी शिथिलता...

राज्यात २१ ते २६ नोव्हेंबर २०२४, तसेच २४ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२४ पर्यंत आणि ३१ डिसेंबर रोजी सरकारने रात्री १० ते मध्यरात्री १२ दरम्यान लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र, ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करून केस-टू-केस आधारावर परवानगी दिली जाईल. अधिकारी वर्ग अनुपालनावर लक्ष ठेवतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com