Anjuna Noise Pollution: बंदिस्त पब्समधील ‘संगीत’ तपासा; हायकोर्ट पुन्हा सख्त; कारवाई रिपोर्ट सादर करण्याचे पोलिसांना निर्देश
Court Dainik Gomantak

Anjuna Noise Pollution: बंदिस्त पब्समधील ‘संगीत’ तपासा; हायकोर्ट पुन्हा सख्त; कारवाई रिपोर्ट सादर करण्याचे पोलिसांना निर्देश

Goa Police: खुल्या जागेत संगीत वाजवण्यात येणाऱ्या रेस्टॉरंट्स किंवा पब्समध्ये विशेष पोलिस पथकाने देखरेख ठेवावी.
Published on

हणजूण क्षेत्रातील ध्वनिप्रदूषणसंदर्भात जनहित याचिकेत प्रतिवादी केलेल्या ५ बंदिस्त क्लब्समध्ये पार्ट्यांवेळी कर्कश संगीताचा आवाज बाहेर येतो का, याची तपासणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने (पीसीबी) करावी. पोलिस उपअधीक्षकांनी स्थापन केलेल्या तीन विशेष पोलिस भरारी पथकांनी पुढील आठवड्यात केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अवमान याचिकेवरील सुनावणीवेळी दिले.

अवमान याचिकेत ज्या पाच रेस्टॉरंट्स व पब्सना ध्वनिप्रदूषणसंदर्भातच्या तक्रारीवरून प्रतिवादी केले होते त्यांना नोटीस मिळाल्यावर ते उच्च न्यायालयात हजर झाले. त्यांना या नोटिसीला उत्तर देण्यास आठवड्याची मुदत दिली आहे.

Anjuna Noise Pollution: बंदिस्त पब्समधील ‘संगीत’ तपासा; हायकोर्ट पुन्हा सख्त; कारवाई रिपोर्ट सादर करण्याचे पोलिसांना निर्देश
Anjuna Noice Pollution: हणजूणमधील ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी तीन पोलिस पथके तैनात; राज्‍य सरकारची गोवा खंडपीठाला माहिती

दरम्यान, खुल्या जागेत संगीत वाजवण्यात येणाऱ्या रेस्टॉरंट्स किंवा पब्समध्ये विशेष पोलिस पथकाने देखरेख ठेवावी. जर संगीताची मर्यादा दिलेल्या परवान्यापेक्षा अधिक असेल किंवा नियमांचे उल्लंघन केल्यास त्वरित कारवाई करण्यात यावी. या तीन पथकांमधील अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत त्यावर ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी नागरिक करू शकतात.

Anjuna Noise Pollution: बंदिस्त पब्समधील ‘संगीत’ तपासा; हायकोर्ट पुन्हा सख्त; कारवाई रिपोर्ट सादर करण्याचे पोलिसांना निर्देश
Anjuna Noise Pollution: हणजूण येथील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांची 3 पथके तैनात!

यांच्याविरुद्ध सर्वाधिक तक्रारी

डियाझ पूल क्लब ॲण्ड रेस्टॉरंट, हणजूण (५३ कॉल्स), नोवा गोवा, वझरांत-वागातोर (५१कॉल्स), थलसा, वाडी-शिवोली (२६ कॉल्स), बार हिफी, शापोरा-शिवोली (२५ कॉल्स), रियथ वझरांत-वागातोर (१७ कॉल्स) या त्या पाच रेस्टॉरंट्स व पब्सचा सर्वाधिक ध्वनिप्रदूषणसंदर्भातच्या तक्रारींमध्ये समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com