Ferry Boat Fare: भाजप सरकारला अखेर माघार घ्यावी लागली; फेरीबोट शुक्लावरून आलेमावांचा टोला

जनतेच्या प्रखर विरोधाला घाबरून तसेच लोकशक्ती हीच सर्वोच्च आहे हे ओळखून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नदी परिवहन खात्याला फेरी बोट तिकीट दरवाढ मागे घेण्याच्या सूचना दिल्या.
Yuri Alemao slams goa government over ferry boat fare
Yuri Alemao slams goa government over ferry boat fare Dainik Gomantak

Yuri Alemao slams goa government over ferry boat fare

भाजप सरकारची माघारी सुरू झाली आहे. जनतेच्या प्रखर विरोधाला घाबरून तसेच लोकशक्ती हीच सर्वोच्च आहे हे ओळखून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नदी परिवहन खात्याला फेरी बोट तिकीट दरवाढ मागे घेण्याच्या सूचना दिल्या. गोवा आणि गोमंतकीयांसाठी लढणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

Yuri Alemao slams goa government over ferry boat fare
Sachin Tendulkar : सचिन कुटुंबासह गोव्यात दाखल ; घेतला फिश थाळीचा आस्वाद

गोव्यातील भाजप सरकारने आपल्या जनविरोधी निर्णयांनी सर्वसामान्यांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. असंवेदनशील भाजप सरकार नेहमीच बेजबाबदार धोरणांसह उपेक्षित क्षेत्राला लक्ष्य करते, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.

भाजप सरकारची गरीब विरोधी व श्रीमंतांच्या फायद्याची धोरणे जनतेला पूर्ण कळली आहेत. या महिन्यात मतदान होत असलेल्या राज्यांमध्ये आणि 2024 मध्ये केंद्रातून भाजप सरकारला माघारी पाठविण्यसाठी लोक कमळाच्या विरोधात मतदान करतील, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.

2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या ओएसडीने पूढे केलेल्या एका साध्या नोटच्या आधारे व कोणताच अभ्यास न करता 2021 मध्ये खरेदी करण्यात आलेल्या सोलर फेरी बोटवर जवळपास 4 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सौर फेरी बोट कित्येक काळ बंद राहिली. आता उंदरांनी फेरी बोट ताब्यात घेतली आहे, असा टोला युरी आलेमाव यांनी हाणला.

गोव्यात रो-रो फेरी बोटी सुरू करण्याच्या सरकारचा प्रस्ताव म्हणजे सोलर फेरीबोटीची पुनरावृत्ती असल्याचे वाटते. रो-रो बोटी सुरळीत चालाविण्यासाठी सरकारने प्रथम योग्य यंत्रणा उभारली पाहिजे. सर्व नियम पाळूनच रो-रो फेरी बोटींची खरेदी केली जाईल अशी मी आशा बाळगतो, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

नदी परिवहन खात्याकडे 31 फेरी बोटी आहेत त्यापैकी काही 1986 आणि 1988 मॉडेलच्या आहेत. या फेरी बोटींचे शासनाकडून काही फिटनेस ऑडिट केले जाते की नाही याबद्दल मला शंका आहे. सरकारने इव्हेंट मॅनेजमेंटवर होणारा सर्व फालतू खर्च थांबवण्याची वेळ आली असून गोमंतकीयांना सुरक्षित वाहतूक व्यवस्था पुरवण्यासाठी तो निधी वापरला जावा, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com