'गोवा माईल्स'ला विरोध कायम, मोपा लिंक रोडवरील टोल हटवण्याची मागणी; स्थानिक टॅक्सीचालकांनी पुकारले बंड

Goa Taxi Operators Protest: मोपा विमानतळावरील गोवा माईल्सचा काउंटर हा बेकायदेशीर, टॅक्सीचालक रामा वारंग.
'गोवा माईल्स'ला विरोध कायम, मोपा लिंक रोडवरील टोल हटवण्याची मागणी; स्थानिक टॅक्सीचालकांनी पुकारले बंड
Goa Taxi Operators ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

मोपा विमानतळाच्या लिंक रोडवरील टोल सेवा हटवा, अशी मागणी करत स्थानिक टॅक्सीचालकांनी बंड पुकारले. बुधवारी (ता.24) म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिराच्या प्रांगणात दोनशे ते तीनशे टॅक्सीचालकांनी एकत्र जमत सरकारच्या वाहतूक धोरणांवर सडकून टीका केली. तसेच गोवा माईल्सला विरोधाची भूमिकाही कायम त्यांनी कायम ठेवली.

मुख्यमंत्र्यांनी गुदिन्हो यांना वाहतूक मंत्रिपदाच्या खुर्चीवरुन काढून टाकावे. अद्याप त्यांना स्थानिक टॅक्सीचालकांचे प्रश्न सोडविता आलेले नाही. ते अकार्यक्षम मंत्री असून गुदिन्हो यांची उचलबांगडी करावी. तसेच गुदिन्हो यांना आमचे विषय सोडविता येत नसल्यास त्यांनी पुढील निवडणूकीस उभे राहू नये, अशा शब्दांत टॅक्सीचालक चेतन कामत यांनी गुदिन्होंवर तोंडसुख घेतले.

'मोपा'वरील टॅक्सीचालक रामा वारंग म्हणाले की, मोपा विमानतळावरील गोवा माईल्सचा काउंटर हा बेकायदेशीर आहे. वाहतूकमंत्री गोवा माईल्सची स्तुती करत असले तरी, ही अॅप सेवा पुरविणाऱ्या टॅक्सीचालकांविरुद्ध अनेक गुन्हे नोंद होत आहेत. आमच्या गाडीला मीटर बसविले आहेत, त्यांचा उपयोग तरी काय ? मुळात या मीटरचा गोव्यात वापर होत नाही. मीटर स्वरूपात टॅक्सीमालकांवर आर्थिक भुर्दंड लादला गेला आहे, तो सरकारने हटवावा.

'गोवा माईल्स'ला विरोध कायम, मोपा लिंक रोडवरील टोल हटवण्याची मागणी; स्थानिक टॅक्सीचालकांनी पुकारले बंड
Goa Monsoon 2024: घराची पडझड, रस्त्याला भगदाड, भात शेतीचे नुकसान; गोव्यात पावसाचा कहर, 10 फोटो

आमचे दुःख त्यांना काय कळणार?

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना एका टॅक्सीचालकाने सोशल मीडियावर धमकी दिली आहे. याविषयी चेतन कामत यांना प्रश्न केला असता ते उत्तरले की, मंत्र्यांनी कुणी म्हटले ते दाखवावे. त्यात काही गैर असल्यास सांगावे.

कारण टॅक्सीचालकांचे दुःख इतरांना कळणार नाही. राहिला प्रश्न मंत्र्यांना धमकी आल्याचा, त्यावर उत्तर देणे मला गरजेचे वाटत नाही. मंत्र्यांकडे सर्व प्रशासकीय यंत्रणा आहेत, मग त्यांनीच शोध घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com