गोव्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
राज्यातील दोन्ही जिल्ह्यात विविध ठिकाणी पडझडीच्या घटना घडत असून, मालमत्तेचे नुकसान होत आहे.
खोर्ली-म्हापसा येथील घरावर झाड कोसळून घराची कौले खाली आली, यात दोन महिला जखमी झाल्या आहेत.
सडये, शिवोलीत झाड कोसळून घराचे नुकसान झाले. या घराच्या पाच लाख रुपयांचे नुकसाना झाल्याचा दावा मालकाने केला आहे.
कळंगुट - बागा येथील मार्गावर सततच्या पावसामुळे कमकुवत झालेला मार्गाला मोठे भगदाड पडल्याची घटना समोर आली.
यामुळे मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. काही दिवसांपूर्वी याच भागातील टीटोज लेन येथे अशाप्रकारे भगदाड पडले होते.
भूतखांब पठारा लगत भलमोठा जुनाट वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडल्याने या भागातील वाहतूक ठप्प. वाहतूक केरी मार्गे वळवण्यात आली आहे.
राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मेरशी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा सत्र न्यायालयाचे उद्घाटनापूर्वीच छप्पर उडाले.
डिचोली पालिका क्षेत्रातील लाखेरे येथे वादळीवाऱ्याचा तडाखा बसल्याने विजेचे आठ खांब मोडले. वीजवाहिन्या तुटल्या. लाखेरे परिसर अंधारात गेला आहे.
वाठादेव डिचोली येथील रमेश वझे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून लोखंडी शेड चे नुकसान. यात अंदाजे ३ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे मोले येथील सहा हजार चौरस मिटरात असलेल्या तीन शेतकऱ्यांची शेती धोक्यात आली आहे. धारबांदोडा कृषी अधिकाऱ्याकडून याची पहाणी करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.