म्हापसा शहर दुर्गंधीच्या विळख्यात

साचलेल्या कचऱ्यामुळे स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत असून, या कचऱ्यामुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे
Garbage Problem In Mapusa
Garbage Problem In MapusaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: म्हापसा येथे कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या कडेला पसरले आहेत, मुख्य शहरातील बसस्थानक, रस्ते आणि मोकळ्या ठिकाणांसारख्या सार्वजनिक ठिकाणी तसेच वॉर्डातील इतर अनेक भागात कचऱ्याचे ढिगारे पसरलेले दिसत आहेत. तसेच म्हापसा मार्केट सब-यार्ड आणि इतर काही भागात देखील कचरा पडलेला आढळतो. (local residents are being inconvenienced due to accumulated waste in mapusa)

Garbage Problem In Mapusa
मायकल लोबो: निकालानंतर पाचच मिनिटांत सरकार स्थापन करू

साचलेल्या कचऱ्यामुळे स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत असून, या कचऱ्यामुळे (Garbage Problem) दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. भटकी कुत्री आणि गुरे अन्नाच्या शोधात कचर्‍यावरून फिरत असल्यामुळे हा कचरा सर्वत्र पसरत आहे. रस्त्यांची साफसफाई केली जात नाही, तसेच कचरा देखील नियमितपणे उचलला जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. वारंवार तक्रारी करूनही, म्हापसा म्युनिसिपल कॉर्पोरेशन (Mapusa Municipal Corporation) याबाबत दखल घेत नाही, असा दावा येथील स्थानिक रहिवाश्यांनी केला.

घरोघरी कचरा उचलण्याचे काम सुरळीत सुरू असले तरी सार्वजनिक व मोकळ्या जागेतून कचरा उचलण्यात अडचण येत असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. प्रभाग 13 च्या नगरसेवक कोमल डिसोझा यांच्या म्हणण्यानुसार, नागरी संस्था कचरा व्यवस्थापनाची कामे करण्यात आणि शहरातील स्वच्छता व्यवस्थित ठेवण्यात अपयशी ठरली आहे. मात्र, घरोघरी कचरा उचलण्याच्या योजनेत कोणतीही अडचण नसल्याचे तिने सांगितले.

“आमच्या परिसरातील एक मोकळी जागा गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याने साचलेली आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून रस्ता झाडण्यात आलेला नाही,” म्हापसा येथील रहिवासी पीटर डीसा म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com