लोबो दांम्पत्याची कळंगुट-शिवोलीत कसोटी

शिवोलीचा मागासलेपणा पुसणाराच ठरणार विजेता
Michael Lobo
Michael LoboDainik Gomantak
Published on
Updated on

 कळंगुट आणि शिवोली मतदार संघातून सरतेशेवटी कळंगुटचे माजी मंत्री आमदार तथा मंत्री  मायकल लोबो तसेच पर्राच्या माजी सरपंच दिलायला लोबो यांच्या उमेदवारीवर कॉग्रेसचा शिक्कामोर्तब झाला आहे. कळंगुट मतदार संघातून मायकल लोबो यांच्यासमोर कधी नव्हे असे भाजपाचे जोजफ सिक्वेरा आणि  त्रुणमुलचे एन्थॉनी मिनेझीस यांनी कडवे आव्हान उभे केले असून सोबत आम आदमी पक्षाचे तरुण उमेदवार व एकेकाळचे मायकलचे जवळचे मित्र असलेल्या सुदेश मयेंकर यांनीही दंड थोपटले आहेत.

दरम्यान, महिन्याभरापुर्वीच कॉंग्रेसचे (Congress) त्रिदेव म्हणून ओळखले जाणारे आग्नेलो फर्नाडीस, जोजफ सिक्वेरा आणि एन्थॉनी मिनेझीस यांनी जोजफने भाजपात प्रवेश करताच  त्रुणमुलची फुले हाती घेतली आणि  जिंका किंवा मरुं या एकमेव इराद्याने सध्या कळंगुट पंचक्रोशीतील घरांघरांत प्रचार करतांना दिसत आहेत. तथापि, बार्दैशातील राजकीय (Politics) चाणक्य म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री मायकल लोबो यांनी कॉंग्रेसची तिकीट आपल्यासहित आपल्या पत्नी दिलायला लोबो यांच्यासाठी हातोहात पटकावून सर्वानाच जबर राजकीय धक्का दिला आणि एकवेळ कोण हे मायकल लोबो (Michael Lobo) असा प्रश्न पत्रकारांना विचारणार्या कॉग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनाही चेटमेट करून सोडले.

Michael Lobo
भाजप खाणी सुरू करणार नाहीच; सुदिन ढवळीकर

गेली दहा वर्षे कळंगुटवर अधिराज्य करणाऱ्या माजी मंत्री मायकल लोबो यांनी कळंगुटचा पुर्णपणे कायापालट केल्याचे त्यांचे जवळचे समर्थक सांगतात तर दुसऱ्या बाजूने आतापर्यंत कळंगुटचा (Calangute) विकास पुर्णपणे झालेला असल्याने तेथे विकासासाठी आणि विशेष कांही राहिले नसल्याचे लोबोंचे प्रतिस्पर्धी त्रुणमुलचे एन्थॉनी मिनेझीस यांनी नुकतेच वक्तव्य केल्याचे ऐकिवात आले त्यामुळे स्थानिक मतदार मात्र पुर्णपणे चक्रावून गेल्याचे याभागाचा दौरा केला असता दिसून आले. दुसऱ्या बाजूने शिवोलीत कधी नव्हे असा इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकीचा सर्वत्र प्रचार होत असतांना दिसतो आहे.

भाजपचे (BJP) उमेदवार दयानंद मांद्रेकर आपल्या उतार वयातही तितक्याच नेटाने प्रचारात उतरल्याचे दिसत असून त्याला तोडीस तोड म्हणून कॉग्रेस कडून प्रथमच मैदानात उतरलेल्या दिलायला लोबो यांंनीही सध्या शिवोली पंचक्रोशीतील घरांघरांतून जोरदार प्रचार चालवला आहे. सोबत अपक्षांची भाउगर्दी झालेल्या शिवोलीत माजी गोवा फॉर्वार्डचे माजी आमदार विनोद पालयेंकर, शेवटच्या क्षणी सर्व प्रयत्न फोल ठरल्याने अपक्ष म्हणूनच निवडणुकीीीच्या मैदानावर उतरले आहेत. अन्य उमेदवारांत हणजुणचे सरपंच सावियो आल्मेदा, आरजीचे

Michael Lobo
महिलांवर बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची जीभ पुन्हा घसरली

गौरेश मांद्रेकर, भाजपच्या एकेकाळच्या निष्ठावंत पल्लवी दाभोलकर, आपचे विष्णू नाईक, शिवसेनेच्या करिश्मा परैरा, आदी उमेदवार रिंगणात आहेत. सध्या, प्रत्येक उमेदवारांकडून जिंकण्याचा दावा केला जातो परंतु शिवोली मतदार संघाचा मागासलेपणा दूर करून पंचक्रोशीचा कायापालट करण्याची धमक असलेलाच शिवोलीत बाजी मारणार असे याभागातील स्थानिक मतदार सांगतात. शिवोली पंचक्रोशीतील बहुतेक पंचायतींचे सरपंच आणी इतर पंचायत मंडळांनी दिलायलाच्या हाती हात देत जोरदार प्रचार चालवलेला आहे तरी शेवटच्या क्षणापर्यंत जो कुणी मतदारांशी तसेच त्यांच्या भावनांशी टिकून राहील तोच शिवोलीत बाजी मारणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com