Querim Beach: सेल्फी पायी गमावला जीव, केरी दुर्घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिली महत्वाची माहिती

त्यांनी केलेल्या फोटोशूटमुळेच हा प्रकार घडल्याचे आता समोर येतंय.
Accident
AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

केरी समुद्रकिनारी घडलेल्या दुर्घटनेबाबत मोठी अपडेट हाती येतेय. नो सेल्फी झोनचा फलक लावलेला असूनही त्या चौघांना सेल्फीचा मोह आवरला नाही. समुद्रालगतच्या खडकाळ भागात ते चौघे गेले आणि त्यातूनच ही घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

Accident
Indian Super League: एफसी गोवाचे प्रशिक्षक पेनया यांना निरोप

या विषयी सविस्तर माहिती अशी की, केरी समुद्रकिनाऱ्यावर अंदाजे 23 जणांचा ग्रुप फिरण्यासाठी आला होता. त्यातील चौघेजण किनाऱ्यालगतच्या खडकाळ भागात सेल्फी घेण्यासाठी गेले असल्याचे तेथील स्थानिकांचे म्हणणे आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी ही मुलं सेल्फी घेण्यासाठी गेली तिथे प्रशासनामार्फत 'डेंजर झोन आणि नो सेल्फी' असे लिहिलेला बोर्ड आहे. असे असून देखील त्यांना सेल्फीचा मोह आवरला नाही आणि त्यांचा तोल गेल्याने ही दुर्घटना घडली.

Accident
Yachting Competition: आयक्यू फॉईल प्रकारात जोरदार चुरस, डेन कुएल्होची निसटती बाजी

बुडालेली मुले ही एकाच कुटुंबातील असून त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत तर अन्य दोघांचा शोध सुरु आहे. दरम्यान त्यांनी केलेल्या फोटोशूटमुळेच हा प्रकार घडल्याचे आता समोर येतंय.

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी जीवघेणे स्टंट करू नये, आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी तसेच प्रशासनाकडून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असा सूर स्थानिकांमधून आता उमटत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com