Yachting Competition: आयक्यू फॉईल प्रकारात जोरदार चुरस, डेन कुएल्होची निसटती बाजी

आयक्य फॉईलमध्ये विजेता, कात्याला सुवर्णपदक
Yachting Competition
Yachting CompetitionDainik Gomantak
Published on
Updated on

संजय पेटकर

Yachting Competition गोवा यॉटिंग असोसिएशनच्या सेल गोवा स्पर्धेत पुरुषांच्या आयक्यू फॉईल प्रकारात जोरदार चुरस राहिली, मात्र अखेरीस गोव्याच्या डेन कुएल्हो याने सुवर्णपदक जिंकताना आर्मी यॉटिंग नोडच्या जेरोम कुमार याला निसटत्या फरकाने मागे टाकले. स्पर्धा दोना पावला समुद्रात झाली.

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जेरोमने दोन्ही शर्यती जिंकून डेनसमोर कडवे आव्हान उभे केले. सुवर्णपदकासाठी गोव्याच्या सेलरला शेवटची शर्यत जिंकणे अत्यावश्यक होते.

आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या जेरोमने सारा अनुभव पणास लावला, मात्र डेन याने निसटत्या फरकाने शर्यत जिंकली. त्याला सुवर्ण, जेरोमला रौप्य, तर सौरभ कुमारला ब्राँझपदक मिळाले.

Yachting Competition
Querim Beach: पीडितांच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री वाढदिवस सोहळा रद्द करतील ? - पणजीकर

महिलाच्या आयक्यू फॉईल प्रकारात कात्या कुएल्होने हिने अपराजित धडाक्यासह सुवर्णपदक जिंकले. तमिळनाडूच्या ऐश्वर्या गणेश हिला रौप्यपदक मिळाले.

आरएसःएक्स गटात इबाद अली याने सुवर्ण, वेद प्रकाश याने रौप्य, तर मिथेलेश कुमार याला ब्राँझपदक प्राप्त झाले. आरएसःवन खुल्या गटात गणेश विश्वकर्मा, नारायण मुंडा व काया कुएल्हो यांना पहिले तीन क्रमांक मिळाले.

Yachting Competition
Indian Super League: एफसी गोवाचे प्रशिक्षक पेनया यांना निरोप

रेसबोर्ड प्रकारात चेन्नय्या, एन. एस. रावत व कमलापती यांनी, तर रेसबोर्ड युवा विभागात एन. वाम्शी, गोव्याचा आदर्श चुनेकर व विश्वेश यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व ब्राँझपदक मिळाले.

ग्रँडमास्टर गटात गोपाळ अमिन यांना दुखापत झाल्यानंतर कॅप्टन एम. सुब्रमण्यम, कॅप्टन सुरेश बाबू व ब्रिगेडियर पी. सी. रॉय यांनी, तर टॉपर क्लास प्रकारात जोगेंद्र ठाकूर, रैती बाबाजी व कर्नल मिलिंद प्रभू यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले.

दोना पावला येथील डॉल्फिन अॅडव्हेंचर स्पोर्टस येथे झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यास भारतीय यॉटिंग संघटनेचे सचिव कॅप्टन जीतेंद्र दीक्षित, सेराफिन लॉरेन्स, नितीन सक्सेना, कॅप्टन दोंडे, कर्नल सतीश कंवर, चंद्रशेखर दलाई, जिजो फिलीप, गोपाळ अमिन, रेनर डायस यांची उपस्तिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com