Goa Medical College Hospital: गोमेकॉत पुढील वर्षापासून यकृत, हृदय प्रत्यारोपण : डॉ. बांदेकर

रुग्णांना तीन महिन्यांची औषधे
GMC Goa
GMC GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Medical College Hospital: गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील अवयव दान कार्यक्रम जीव वाचवणारा ठरत आहे. ब्रेन डेड रुग्णाने दान केलेल्या अवयवांचे प्रत्यारोपण केल्याने चार जणांचे प्राण वाचले.

त्या अनुषंगाने गोमेकॉ रुग्णालयात पुढील वर्षापासून हृदय व यकृत प्रत्यारोपण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.

रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. बांदेकर यांनी सांगितले की, ‘सध्या ‘गोमेकॉ’त किडनी प्रत्यारोपण केले जाते. पण

GMC Goa
Accident News : ट्रकखाली चिरडल्याने 6 वर्षीय मुलाचा मृत्यू; शिवोली येथील घटना

अनेक वेळा रुग्णांना इतर विशिष्ट अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. त्यावेळी हा उपक्रम जीव वाचवणारा ठरतो. त्यामुळे अवयवदानासंदर्भात जनजागृती करण्यात येईल’.

दरम्यान, गोमेकॉत जुन्या औषधांच्या निविदा संपल्यामुळे केवळ एका महिन्यांची औषधे दिली जात आहेत. नवीन औषधांच्या निविदा शासनस्तरावर मंजूर झाल्या असून आता ज्येष्ठ रुग्णांना तीन महिन्यांची औषधे दिली जातील, असा निर्णय घेतल्याची माहिती बांदेकर यांनी दिली.

दरम्यान, ‘त्या’ तरुणाच्या मूत्रपिंड रोपणाची दुसरी शस्त्रक्रिया आज पार पडली. रविवारी हृदयाचे रोपण मुंबईतील रिलायन्स इस्पितळात ५१ वर्षीय महिलेसाठी तर यकृत अहमदाबाद येथील सीआयएमएस इस्पितळातील ४७ वर्षीय पुरुषासाठी रोपण केले.

GMC Goa
Goa Statehood Day: काय आहे गोवा घटकराज्य दिन? 7 पॉईंट्समध्ये जाणून घ्या, या दिवसाचे महत्व...

युवकाच्या वडिलांचे धैर्य प्रशंसनीय

आंबे तोडण्यासाठी झाडावर चढलेला 19 वर्षांचा मुलगा घसरून नाल्यात पडला होता. त्याला गोमेकॉत भरती करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याच्या मेंदूने काम करणे बंद केल्याने तो ‘ब्रेन डेड’ झाला.

दरम्यान, दु:खद प्रसंगीही सामाजिक बांधिलकी जपत वडिलांनी आपल्या मुलाचे यकृत, किडनी, हृदय दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे त्याग आणि धैर्य प्रशंसनीय आहे, अशी भावना डॉ. बांदेकर यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com