Dudhsagar Waterfalls: फोटोचा मोह बेतला असता जीवावर, दुधसागर धबधब्यात पडलेल्या गुजरातच्या पर्यटकाला वाचविण्यात यश

Rescue Operations In Goa: पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर चालत असलेल्या बंगळुरुच्या २३ वर्षीय पर्यटकाला अचानक फिट्सचा त्रास होऊ लागला.
Dudhsagar Waterfall Rescue Operation
Dudhsagar WaterfallsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: फोटो काढताना पाय घसरुन दुधसागर धबधब्यात पडलेल्या गुजरातच्या पर्यटकाला पडलेल्या वाचविण्यात यश आले आहे. कोलवा समुद्रकिनाऱ्यावर पालकांपासून दुरावलेल्या चार वर्षीय मुलाची पुर्नभेट घडवून आणली. तसेच, हॉलंट बीचवर जखमी झालेल्या युवतीला प्रथमोपचार देण्यात आले.

दुधसागर धबधबा येथे पर्यटकाला वाचविण्यात यश

दुधसागर धबधब्यावर फोटो काढताना पाय घसरुन पाण्यात पडलेल्या ४४ वर्षीय गुजरातच्या पर्यटकाला दृष्टी जीवरक्षकाच्या वतीने वाचविण्यात आले. दृष्टी जीवरक्षकच्या शाहनवाज नदाफ यांनी या पर्यटकाला सुरक्षितपणे बाहेर काढले.

हॉलंट बीचवर पर्यटक जखमी

बोगमाळो समुद्रकिनाऱ्यावर काचेच्या तुकड्यावर पाय पडून युवती जखमी झाली. दृष्टीच्या जीवरक्षकांनी युवतीला तातडीने प्रथमोपचार दिला. त्यानंतर उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

Dudhsagar Waterfall Rescue Operation
World Record: कोकणी नाटकाने मराठी नाटकाचा विक्रम मोडला; 'गांव जाला जाण्टो'चे एकाच दिवसात पार पडले सात प्रयोग

बंगळुरुच्या पर्यटकाला आल्या फिट्स

पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर चालत असलेल्या बंगळुरुच्या २३ वर्षीय पर्यटकाला अचानक फिट्सचा त्रास होऊ लागला. समुद्रकिनाऱ्यावर पेट्रोलिंग करणाऱ्या दृष्टिच्या जीवरक्षकांनी घटनास्थळी दाखल होत पर्यटकाला प्रथमोपचार देऊन पूर्वपदावर आणले. पर्यटकाच्या तब्येतीत काहीसी सुधारणा झाल्यानंतर १०८ च्या मदतीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोलवा बीचवर चार वर्षीय बालिका झाली बेपत्ता

कोलवा बीचवर चार वर्षीय मुलगा त्याच्या पालकांपासून अचनाक बेपत्ता झाली. दृष्टीच्या जीवरक्षकांनी १५ मिनिटांत जीवरक्षकांनी त्याचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com