World Record: कोकणी नाटकाने मराठी नाटकाचा विक्रम मोडला; 'गांव जाला जाण्टो'चे एकाच दिवसात पार पडले सात प्रयोग

Konkani Play World Record: गोव्यात सर्वांना भूरळ घातलेल्या या नाटकाने जागतिक पातळीवर देखील ठसा उमटवला आहे.
Gao Zala Janto
Konkani Play World RecordDainik Gomantak
Published on
Updated on

'गांव जाला जाण्टो' या कोकणी नाटकाने एकाच दिवसात सात प्रयोग करत जागतिक विक्रम केला आहे. या कोकणी नाटकाने 'अलबत्त्या गलबत्त्या' या मराठी नाटकाचा विक्रम मोडीत काढला आहे. 'अलबत्त्या गलबत्त्या'ने सलग ६ प्रयोग केले होते. या विक्रम आता कोकणी नाटकाने मोडून काढला आहे.

राजदीप नाईक यांच्या कला चेतना वळवई संस्थेच्या वतीने 'गांव जाला जाण्टो' हे नाटक सादर केले जाते. या संस्थेने आता हा विक्रम नावावर केला आहे. राजीव गांधी कलामंदीर फोंडाच्या मुख्य मास्टर दत्ताराम सभागृहात १८ मे रोजी हे प्रयोग सादर झाले. नाटकाचा प्रत्येक शो दोन तास चालतो.

या विक्रमाला वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने मान्यता देत आणि प्रमाणित केले, संस्थेचे मुख्य संपादक आणि वरिष्ठ न्यायाधीश यांनी अधिकृतपणे प्रमाणपत्र आणि पदकं प्रदान केली.

Gao Zala Janto
Goa To Mumbai Liquor Smuggling: गोव्यातून मुंबईत विदेशी मद्याची तस्करी, 64 लाखांची अवैध दारु जप्त

'गांव जाला जाण्टो' या कोकणी नाटक सुचिता नार्वेकर यांनी लिहले असून, अमोग बुडकुले यांनी दिग्दर्शित केले आहे. सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या या विनोदी नाटकाची निर्मिती राजदीप नाईक यांनी केली आहे.

गोव्यात सर्वांना भूरळ घातलेल्या या नाटकाने जागतिक पातळीवर देखील ठसा उमटवला आहे. युनायटेड किंग्डममध्ये सादर होणारे हे पहिलेच कोकणी नाटक ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com