
Mapusa Restaurants Noise Pollution
पणजी : कर्णकर्कश संगीत वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बार आणि रेस्टॉरंटविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. डिसेंबर महिन्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जोरजोरात गाणी वाजवणाऱ्या रेस्टॉरंटवर कारवाई झाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले असून हॉटेल मालकांचे मात्र धाबे दणाणले आहेत. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तीन आस्थापनांचे परवाने रद्ध करण्यात आले आहेत. तर बाकी चार आस्थापनांचे कंसेंट टू ऑपरेट परवाने रद्द करण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायदा १९८१च्या कलम ३१ (ए) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
GPCB ने शिवोली मधील मेसर्स टेल्मा डिसा, हणजूण येथील मेसर्स नोहा आणि हणजूण मधल्या मेसर्स डायज याचे कंसेंट टू ऑपरेट परवाने रद्द केलेत. आता रेस्टॉरंट्स मालकांना मंडळाला लेखी उत्तर द्यावे लागणार आहे.
याशिवाय हणजूण मधील मेसर्स विस्ता मारे, शिवोलीतील डीज, हणजूण मधील डायना बिल्डवेल व व्हागतोर हीलटॉप यांना काही दिवसांसाठी रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत आता २० डिसेंबर रोजी ही रेस्टॉरंट्स प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर त्यांची बाजू मांडतील आणि त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. 'तुमचे Consent to Operate हा परवाना रद्द का करू नये' अशी नोटीस या चार आस्थापनांना पाठवण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.