Goa Film City: एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवाची फिल्मसिटीसाठी तत्परता; सल्लागार निवडण्याची प्रक्रिया सुरू

लोलये येथील भगवती पठारावर उभारणार फिल्मसिटी
Goa Film City
Goa Film City Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Film City: एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) ने राज्यात 200 एकरात फिल्म सिटी उभारण्याची योजना आखली आहे.

त्यासाठी सल्लागार सेवा देण्यासाठी सल्लागार निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यात ईएसजीने तत्परता दाखवली आहे.

लोलये कोमुनिदादने अलीकडेच 250 एकरवर फिल्मसिटीसाठी इंटरेस्ट दाखवला होता. येथे पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ट्रान्झॅक्शन अॅडव्हायझरी सर्व्हिसेससाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया ESG ने सुरू केली आहे.

Goa Film City
Goa Highways Speed Limit: गोव्यातील महामार्गांवर वेगमर्यादा निश्चित्त होणार; 70 किमी प्रतितास टॉप स्पीड शक्य?

ईसजीने काढलेल्या निविदेसाठी खाजगी विकासकाची निवड करण्यासाठी, त्याला मदत करण्यासाठी सल्लागाराची आवश्यकता आहे. जो लोलये येथील भगवती पठारावर 'फिल्म सिटी' विकसित करेल.

सल्लागाराने व्यवहार सल्लागार सेवांचे काम दोन महिन्यांत पूर्ण करणे आणि त्याला दिलेले संपूर्ण काम चार महिन्यांत पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.

निविदेत दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्व काही घडल्यास, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस ESG कडे फिल्म सिटीचा गुंतवणूकदार-सह-विकासक असेल.

ईएसजीने काही काळापुर्वीच फिल्मसिटीसाठी 250 एकर जमीन असलेल्या एकल किंवा संयुक्त जमीन मालकांना सहकार्य करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली होती.

या जाहिरातीनंतर काही आठवड्यांतच लोलियेच्या कम्युनिदादने जाहिरातीला प्रतिसाद दिला होता. फिल्म सिटी प्रकल्पासाठी 250 एकर जमीन देण्याचा ठराव लोलियेत मंजूर करण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com