गोव्यात भाजपला पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखू!

2022 मध्ये या लोकविरोधी सरकारला कुठल्याही परिस्थितीत सत्तेवर येण्यापासून रोखू असा निर्धार दसऱ्याच्या मुहूर्तावर विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी व्यक्त केला.
President of Goa Forward  Vijay Sardesai
President of Goa Forward Vijay SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यातील (Goa) भाजप सरकार (BJP government) लोकविरोधी असून ते दिल्लीतील आदेशावर चालणारे असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी करतानाच 2022 मध्ये या लोकविरोधी सरकारला कुठल्याही परिस्थितीत सत्तेवर येण्यापासून रोखू असा निर्धार दसऱ्याच्या मुहूर्तावर व्यक्त केला. दसऱ्याच्या मुहूर्तावर सरदेसाई यांनी फातोर्डा येथे कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी त्यांनी विरोधकांची मते फुटून आपण निवडून येऊ या भ्रमात भाजपने राहू नये. भाजपाला सक्षम पर्याय आम्ही उभा करु. येणारे सरकार खऱ्या अर्थाने गोयकारवादी सरकार असेल असे ते म्हणाले. या कार्यक्रमात गोवा फॉरवर्डच्या कामाची झलक दाखविणाऱ्या एका फिल्मचेही प्रकाशन करण्यात आले.

President of Goa Forward  Vijay Sardesai
Goa Politics: अंमली पदार्थ विकणारे निवडणुकीचे उमेदवार झालेत !

सरदेसाई यांची तृणमुल काँग्रेसच्या (Trinamool Congress) नेत्यांशी बोलणी चालू आहेत या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात बोलताना सरदेसाई म्हणाले, वाइटावर मात करून चांगली सुरवात करणे हा दसऱ्याच्या संदेश असतो. गोव्यातील भाजपरूपी रावणाला मारण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. त्यासाठी सक्षम पर्याय आम्ही लोकांसमोर आणू. येणारे सरकार आमचेच असेल असे ते म्हणाले.

गोव्याचे मतदार हुशार असून योग्य उमेदवाराला ते निश्चित निवडून देतात. यापूर्वी तीन राष्ट्रीय पक्ष मैदानात असतानाही फातोर्ड्यातील मतदारांनी मला निवडून दिले. मागच्या निवडणुकीत जे फातोर्ड्यात झाले तेच आता संपूर्ण गोव्यात होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी गोवा फॉरवर्डचे सांत आंद्रे येथील उमेदवार जगदीश भोबे, शिरोडा येथील उमेदवार अकबर मुल्ला, दुर्गादास कामत, मडगावचे नगराध्यक्ष लिंडन परेरा, उपनगराध्यक्ष दीपाली सावळ तसेच अन्य नगरसेवक उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com