

मोरजी: केरी-पेडणे येथील आजोबा मंदिराच्या मागील डोंगराळ परिसरात दोन बिबटे एकमेकांशी खेळताना दिसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वनखात्याने या घटनेची दखल घेतली असून संबंधित परिसरावर लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन खात्याकडून करण्यात आले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डोंगरावरील मोकळ्या व खडकाळ भागात दोन बिबटे वावरताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर वेगाने प्रसारित झाल्यानंतर केरी व आसपासच्या परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली. विशेषतः डोंगरालगत राहणाऱ्या नागरिकांमध्ये तसेच या परिसरातून ये-जा करणाऱ्यांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.
वन खात्याचे अधिकारी तैनात
घटनेची माहिती मिळताच वन खात्याचे अधिकारी अर्जुन शेडगावकर संबंधित परिसरात लक्ष ठेवून असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नागरिकांनी विनाकारण भीती बाळगू नये; मात्र डोंगराळ भागात जाताना सावधगिरी बाळगावी, अशा सूचना दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात पेडणे वन विभागाचे अधिकारी श्री. महाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन बिबट्यांच्या वावराच्या माहितीला दुजोरा दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.