वन खात्याला नाही जमलं अखेर बिबट्याने स्वत:च खाली उतरत जंगलात धूम ठोकली, 18 तास माडाच्या झाडावर मुक्काम

वनखात्याने दिवसभर बिबट्याला खाली घेण्यासाठी अथक प्रयत्न केले. पण, बिबट्या काही खाली आला नाही.
leopard stranded on tall coconut tree at Kuynan Savoi Verem
leopard stranded on tall coconut tree at Kuynan Savoi VeremDainik Gomantak

leopard stranded on tall coconut tree at Kuynan Savoi Verem: सावईवेरे-कुळणवाड्यावरील भरवस्तीत उंच माडावर जाऊन बिबट्या बसला होता. रविवारी सकाळी 8 वा. च्‍या सुमारास बिबट्या वरती गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली. बिबट्याला खाली उतरवण्यासाठी वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, वनखात्याने दिवसभर बिबट्याला खाली घेण्यासाठी अथक प्रयत्न केले. पण, बिबट्या काही खाली आला नाही. अखेर, रात्रीच्या सुमारास बिबट्या माडावर खाली उतरला आणि त्याने जंगलात धूम ठोकली.

कुळण सावईवेरे येथे माडावर अडकलेला बिबट्या मध्यरात्री 2.30 वाजता माडावरुन खाली उतरून जंगलात पळून गेला अशी माहिती वन खात्याकडुन देण्यात आली.

'कुळण सावईवेरे येथे माडावर बसलेल्या बिबट्याची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु असून दिवस असल्यामुळे तो खाली उतरणे शक्य नाही. तसेच रेस्क्यु करण्यासाठी वाव मिळत नाही. पण रात्र झाल्यानंतर तो खाली उतरण्याची शक्यता आहे.' असे वन अधिकारी दिपक तांडेल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले होते.

दरम्यान, मध्यरात्री 2.30 वाजता बिबट्या स्वत:च खाली उतरला आणि त्याने जंगलात धूम ठोकली. यामुळे माडावर बसलेल्या बिबट्यामुळे दहशतीखाली असलेल्या गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

leopard stranded on tall coconut tree at Kuynan Savoi Verem
बिबट्याचा ठिय्‍या माडावर, वनखात्‍याचे कर्मचारी मागावर

नेमकं घडलं काय?

सावईवेरे-कुळणवाड्यावरील भरवस्तीमध्‍ये रविवारी सकाळी 8 वा. च्‍या सुमारास बिबट्या उंच माडावर ठाण मांडून बसला. दाखल झालेल्‍या वन खात्‍याच्‍या कर्मचाऱ्यांकडून रविवारी रात्री उशिरापर्यंत बिबट्याला जमिनीवर आणण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू होते. पण, बिबट्या काही वधला नाही. काळोखातही त्‍याने माड सोडला नव्‍हता.

कुळणवाडा हा कुळागरांचा भाग असल्याने येथे नसर्गिक जलस्रोत आहेत. या वाड्याच्या मागील बाजूला जंगल असल्याने शनिवारी (ता.13) रात्रीच्या वेळी रानातून भुकेने व्याकूळ झाल्याने भक्ष्याच्‍या शोधात बिबट्या या वाड्यात शिरला असावा, असा वन अधिकाऱ्यांनी अंदाज व्‍यक्‍त केला आहे.

मात्र, कुत्र्यांच्या भुंकण्याने किंवा कुत्र्यांनी पाठलाग केल्याने बिथरलेल्या बिबट्याने अशोक सावईकर यांच्या घराशेजारील नारळाच्या झाडाचा आधार घेतला असावा, असाही एक कयास आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com