Leopard In Goa: काणकोण येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी काणकोण येथील एका घराच्या विहिरीतून बिबट्याची सुटका केली.
Leopard stucked in well
Leopard stucked in wellDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी काणकोण येथील एका घराच्या विहिरीतून बिबट्याची सुटका केली. हा नर बिबट्या सुमारे 5 वर्षांचा असून तो भक्षाच्या शोधात निवासी परिसरात आला असावा, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रात्री उशिरा बिबट्या विहिरीत पडला असावा, अशी माहिती स्थानिकांनी दिली. सुटका करण्यात आलेल्या बिबट्याला कोटीगाव वन्यजीव अभयारण्यात सोडण्यात आले.

(Leopard rescued from well at Canacona)

Leopard stucked in well
Goa News: खोट्या माहितीच्या आधारे कुतिन्होंविरोधात 'लूक आऊट'

‘साणाचो व्हाळ’ व ‘सुरंगींकडे’ अशा नावाने ओळखण्यात येणाऱ्या जंगल भागात वन्य प्राण्यांचे वास्तव्य असायाचे. पण, इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्पासाठी रानटी जनावरांचा अधिवास नष्ट झाला.

प्राण्यांचे अधिवास झाले नष्‍ट

यापूर्वी पेडणे नगरपालिकेच्या कचरा प्रकल्पापासून जवळचा अधिवास त्यापूर्वी नष्ट झाल्याने प्राणी अन्न अथवा भक्षाचा शोध घेत थोडेफार शिल्लक राहिलेल्‍या रानात फिरत होते. रानात कुठे गुरे सापडली, तर त्याचा फडशा पाडतात. रानात काहीच न मिळाल्यावर लोकवस्तीत येऊन कुत्रे व पाडसांचा फडशा पाडतात, असे स्‍थानिकांनी सांगितले.

Leopard stucked in well
Central Government: गोवा राज्यातील '266' जणांना नोकऱ्यांची दिवाळी भेट!

तुयेत बिबट्याची दहशत

तुये परिसरात कुत्रे व गुरांना लक्ष्‍य करून बिबट्याने दहशत माजविली आहे. त्‍यामुळे स्‍थानिकांत घबराट पसरली आहे. तुये गावातील कातुर्ली, सोणये पालये, बंदिरवाडा, झळूरे व मुरमुसे या वाड्यावरील परिसरात बिबट्याचा रात्रीच्यावेळी वावर असतो. रात्रीच्यावेळी लोकवस्तीत येऊन बिबट्याने कुत्र्यांना फस्त करण्याचे सत्र आरंभले आहे. यामुळे या भागातील कुत्र्यांची संख्या बरीच कमी झाली आहे. तर काही शेतकऱ्यांची गुरेही या बिबट्याने फस्त केली आहेत.

म्हार्दोळमध्येही बिबट्याची दहशत

बागवाडा - सीमेपाईण म्हार्दोळ भागात पंधरवड्याभरापूर्वी बिबट्या सापडल्याने या परिसरात घबराट पसरली होती. जखमी अवस्थेतील तो बिबट्या मरण पावला असला तरी आता अन्य बिबट्यांच्या डरकाळ्या झरीवाडा-प्रियोळ परिसरात ऐकू येण्याबरोबरच येथील घरांच्या जवळ तसेच रस्त्यावर दर्शनही काही ग्रामस्थांना झाल्याने हा परिसर आता भीतीच्या छायेत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com