Leopard Cub Rescued: आधी वाटले कुत्र्याचे पिल्लू, नंतर निघाला बिबट्याचा बछडा; खांडेपार येथील घटना, Watch Video

Goa Khandepar Leopard: वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी भट गावकर यांच्या निवासस्थानी धाव घेऊन या बछड्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी कुर्टीतील पशुचिकित्सा इस्पितळात केली.
leopard club rescued, leopard rescue in goa, khandepar leopard incident
leopard club rescued, leopard rescue in goa, khandepar leopard incidentDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: पांचमे, खांडेपार येथे संध्याकाळी एक बिबट्याचा बछडा घराच्या अंगणात आल्याने खळबळ उडाली. त्यामुळे या भागात बिबट्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून वन खात्याने उपाययोजना करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

पांचमे - खांडेपार येथील विजय भट गावकर यांच्या घराच्या अंगणात हा बिबट्याचा बछडा आढळला. या घरातील कुटुंबीय संध्याकाळी घरी परतल्यानंतर सातच्या सुमारास या लोकांच्या मागे हा बिबट्याचा बछडा चालत आला.

शरीरात त्राण नसल्यासारखा हा बछडा चालत होता. सुरवातीला या लोकांना कुत्र्याचे पिल्लू असावे असे वाटले, पण बिबट्याचा बछडा असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांनी लगेच प्राणीमित्र संदीप पारकर यांना माहिती दिली.

leopard club rescued, leopard rescue in goa, khandepar leopard incident
Leopard In Goa: डिचोलीत नेमके किती 'बिबटे' फिरताहेत? 2 पकडून नेले, तिसऱ्याच्या वावराच्या खाणाखुणा; स्थानिक भयभीत

त्यानंतर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी भट गावकर यांच्या निवासस्थानी धाव घेऊन या बछड्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी कुर्टीतील पशुचिकित्सा इस्पितळात केली. या भागात बिबट्याचा वावर असून लोकांना धोका आहे, त्यामुळे वन खात्याने योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी भट गावकर यांनी केली.

leopard club rescued, leopard rescue in goa, khandepar leopard incident
Leopard in Bicholim: दिवचले लोकवस्तीत वाडला बिबट्याचा वापर; थळावे भयभीत Watch Video

प्रियोळलाही आढळला होता बछडा

आठ महिन्यांपूर्वी प्रियोळ येथेही असाच बिबट्याचा बछडा सापडला होता. त्यावेळी तेथील एका महिलेने घराजवळ आलेल्या बिबट्याच्या बछड्यावर टोपली टाकून त्याला पकडले होते, मागाहून वन खात्याच्या कर्मचाऱ्यांकडे त्याला सुपूर्द करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com