Leopard attack: बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याचा फडशा; वरचावाडा, हरमल येथील घटना

Leopard attack Varchawada Arambol: वरचावाडा येथील एका घराच्या अंगणात बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Leopard attack
Leopard attackDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: वरचावाडा येथील एका घराच्या अंगणात बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

१७ रोजी पहाटे सुमारे तीनच्या सुमारास बिबट्या दबक्या पावलांनी घराच्या अंगणात आला. गेटजवळ बसलेल्या कुत्र्यावर त्याने झडप घातली व क्षणातच कुत्र्याला घेऊन तो पसार झाला. गेटचा आवाज होताच घरमालक अंगणात आले असता कुत्रा गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले.

Leopard attack
Goa Tourism: जानेवारी, फेब्रुवारीत पर्यटक 'फुल्ल'! मार्चला 'युद्धा'चा फटका; गतवर्षीच्या तुलनेत पहिल्‍या तिमाहीत 32,500 पर्यटकांची वाढ

सुमारे दोन वर्षांपूर्वीही त्याच कुत्र्यावर बिबट्याने झडप घालून त्याला जखमी केले होते. त्यावेळी प्रथमोपचार करून कुत्रा वाचविण्यात आला होता, असे घरमालक नाईक यांनी सांगितले.

Leopard attack
Goa Municipal Elections: पालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये? कायद्यात दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मंजुरी; वटहुकूम लवकरच जारी होणार

गेल्या वर्षी याच भागातील देवानंद नाईक यांच्या मालकीचे रेडकू व कुत्रा यांचा बळी बिबट्याने घेतला होता. त्यावेळी वन खात्याने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पिंजऱ्यात भक्ष्य नसल्याने बिबट्या अडकला नाही, असे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com