गेले काही दिवस मुरगाव नगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी मुख्य रस्त्याकडेला बंद असलेली खाजगी वाहने पार्क केली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आहे तशीच पार्क केलेल्या अवस्थेत आहेत. त्यामूळे सार्वजनिक ठीकाणांचे विद्रुपीकरण होत आहे. यावरुन आज मुरगाव नगरपरिषदेने मोठा निर्णय घेतला आहे.
(Leo Rodrigues inform Mormugao Municipal Council will take action against abandoned vehicles)
मिळालेल्या माहितीनुसार मुरगाव नगरपालिका क्षेत्रात बंद असलेली वाहने पार्क केली आहेत. यावरुन संबंधीत वाहन मालकांनी बंद असलेली वाहनांची योग्य विल्हेवाट लावावी अशा सुचना केल्या, मात्र ही वाहने आहे तशीच पार्क केली असल्याने यावर कारवाई करणार असल्याचं मुरगाव पालिकेचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिक्स यांनी आज स्पष्ट केले आहे.
याबाबत नगरपालिकेने म्हटले आहे की, बंद अवस्थेत असलेली सार्वजनिक ठिकाणी उभी केली वाहने संबधीत व्यक्तींनी काढून घ्यावीत अन्यथा मुरगाव नगरपरिषद येत्या 15 दिवसांच्या आत ती काढेल. आणि अशी वाहने थेट मोडीत काढेल. ज्याच्यामूळे सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण थांबेल असे ही नगराध्यक्ष लिओ रॉड्रिक्स यांनी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.