Goa Education: प्राण्यांच्या चामड्यापासून तयार बूट धोकादायक, शाळेत फक्त कॅनव्हास बूटच वापरा; गोवा शिक्षण खात्याचा आदेश

canvas shoes mandatory Goa schools: अनुदानित, खासगी तसेच विशेष शाळांच्या विद्यार्थ्यांनी केवळ शाळेत येताना गणवेशाचा भाग म्हणून कॅनव्हास बूटच वापरावे लागणार.
Goa Education Order
canvas shoes mandatory Goa schoolsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शाळेत केवळ कॅनव्हास बूटच वापरावेत, असे परिपत्रक गोवा शिक्षण संचालनालयाद्वारे जारी केले आहे. प्राण्यांच्या चामड्यापासून बनविण्यात येणारे बूट तयार करण्यासाठी अत्यंत विषारी रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे पर्यावरण तसेच मानवी त्वचेलाही हानी पोहोचते, असे संचालनालयाने परिपत्रकात म्हटले आहे.

प्राण्यांच्या चामड्यापासून बनविण्यात येणारे बूट तयार करण्यासाठी अत्यंत विषारी रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे पर्यावरण तसेच मानवी त्वचेलाही हानी पोहोचते. कृत्रिम लेदर आणि इतर कृत्रिम साहित्यापासून बनविलेले बूट देखील त्याच रसायनांचा वापर करून तयार केले जातात.

Goa Education Department
Goa Education Department Order

त्यामुळे पर्यावरण आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित, खासगी तसेच विशेष शाळांच्या विद्यार्थ्यांनी केवळ शाळेत येताना गणवेशाचा भाग म्हणून कॅनव्हास बूटच वापरावेत, असे परिपत्रक शिक्षण संचालनालयाद्वारे जारी केले आहे.

Goa Education Order
Abu Farhan Azmi: 'मी गोव्याच्या विरोधात नाही, मला हे राज्य घरासारखेच'; अबू आझमींच्या मुलाचे स्पष्टीकरण

कॅनव्हास बूटच का?

१. शिक्षण संचालनालयाच्या परिपत्रकात म्हटले आहे की, कॅनव्हास बूट हे पर्यावरणपूरक असतात.

२. झीज प्रतिरोधक, अधिक आरामदायक आणि इतर बुटांच्या तुलनेत ते स्वस्त आहेत.

३. पर्यावरण आणि विद्यार्थ्यांना कोणतीही हानी पोहोचत नाही.

४. कॅनव्हास बूट खेळतानाही वापरता येतात. शिवाय नियमित वापरण्यासही ते चांगले असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com