Abu Farhan Azmi: 'मी गोव्याच्या विरोधात नाही, मला हे राज्य घरासारखेच'; अबू आझमींच्या मुलाचे स्पष्टीकरण

Abu Farhan Azmi: हा विषय इथेच संपवूयात. मी माफी देखील मागू शकतो. पण मी चुकीचा नाहीये; फरहान आझमी
Abu Farhan Azmi
Abu Farhan AzmiDainik Gomantak
Published on
Updated on

कांदोळी: आमदार अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांच्या मुलाचा गोव्यातील कळंगुट भागात स्थानिकांशी किरकोळ वाद झाला. कारने वळण घेताना इंडिकेटर दाखवला नाही, यावरुन स्थानिकांनी फरहान यांना घेरलं हा वाद एवढा विकोपाला गेला की प्रकरण पोलिस स्थानकात पोहोचले. कळंगुट पोलिसांनी याप्रकरणी फरहान आझमी यांच्यासह इतर तीन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

फरहान आझमी यांनी जमावाला बंदूक दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पण, बंदूक दाखवलीच नाही, असा खुलासा आझमी यांनी केलाय. त्यानंतर आता फरहान यांनी पुन्हा एकदा खुलासा करताना ते गोव्याच्या विरोधात नसल्याचे म्हटले आहे. गोवा माझ्यासाठी घरासारखेच असल्याचे फरहान आझमी म्हणाले. मी गोव्याच्या विरोधात आहे, असे म्हणून माझे नाव बदनाम केले जात आहे. पण, तसे अजिबात नाही, माझं गोव्यावर प्रेम आहे, असा खुलासा फरहान आझमी यांनी पीटीआयशी बोलताना केला आहे.

Abu Farhan Azmi
Bhutani Project: 'भूतानी'च्या जागेत झाडांची कापणी! वनखात्याच्या पाहणीत धक्कादायक बाब समोर; कारवाईकडे सर्वांचे लक्ष

फरहान आझमी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे पूत्र असून, त्याची पत्नी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आयेशा टाकीया आहे. फरहान आझमी रेस्टॉरंट व्यवसायिक आहेत. दरम्यान, कळंगुटमध्ये घडलेल्या प्रकारानंतर आयेशाने पतीसाठी मैदानात उतरत, "गोव्यात महाराष्ट्र द्वेषाने टोक गाठले असल्याचा आरोप केला. तसेच, जमावाने पती आणि मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आमच्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आहेत", असे आयेशाने एका पोस्टमध्ये म्हटले होते.

Abu Farhan Azmi
Goa Crime: कचरा वेचणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची दिली धमकी; कर्नाटकच्या तरुणाला अटक

"माझ्या कारजवळ मोठ्या संख्येने जमाव गोळा झाल्यानंतर मीच गोवा पोलिसांना फोन केला. मी असा व्यक्ती नाहीये जो बंदूकिचा धाक लोकांना दाखवेन. गेल्या २० वर्षापासून मी गोव्यात येतोय. माझ्यासाठी गोवा घरासारखे आहे. गोवा देशाची पर्यटन राजधानी व्हावी अशी माझी इच्छा आहे. गोव्यात माझे अनेक मित्र आहेत, ही घटना घडल्यानंतर अनेक मित्र माझ्या समर्थनात आहे", असे आझमी म्हणाले.

मी गोव्याच्या विरोधात आहे, असे म्हणून माझे नाव खराब नका करु. हा विषय इथेच संपवूयात. मी माफी देखील मागू शकतो. पण मी चुकीचा नाहीये. गोवा पोलिसांनी मला खूप मदत केलीय, असेही आझमी पीटीआयशी बोलताना म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com