'गोवा विकासकामामध्ये अग्रेसर': दामोदर कासकर

गोव्यात (Goa) होत असलेला विकास त्यात सामान्य जनतेला मिळणारे योजना, यामुळे राज्य विकास कामामध्ये अग्रेसर होत आहे.
Goa

Goa

Dainik Gomantak

वास्को: गोव्यात (Goa) होत असलेला विकास त्यात सामान्य जनतेला मिळणारे योजना, यामुळे राज्य विकास कामामध्ये अग्रेसर होत आहे. गोव्याच्या 60 व्या मुक्तीदिनी (Goa Liberation Day) राज्य त्यात आणखीन पुढाकार घेणार असल्याची माहिती मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष दामोदर कासकर (Damodar Kaskar) यांनी दिली.

वास्को येथील मुरगाव नगरपालिके तर्फे 60 व्या मुक्तीदिनी ध्वजरोहन नगराध्यक्ष कासकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्याधिकारी जयंत तारी, उपनगराध्यक्ष श्रद्धा महाले, नगरसेविका देवीता आरोलकर, मृणाली पार्सेकर, नगरसेवक दामू नाईक, सॅनिटरी नरीक्षक महेश कुडाळकर, म्युनिसिपल स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती मारिया वेलेनिटी बारॅटो,सदाशिव हरमलकर पालिकेचे कामगार, स्कूलच्या शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>Goa</p></div>
Goa Assembly Election: अ‍ॅलेक्सो रेजिनाल्डो टीएमसीमध्ये करणार प्रवेश

पुढे बोलताना नगराध्यक्ष कासकर म्हणाले की राज्य सरकारच्या सहकार्याने मुरगाव नगरपालिकेचे विविध कामे मार्गी लागत असून, यात पालिकेच्या इमारतीचे नूतनीकरण, नवीन मार्केट, सडा कचरा प्रकल्पात नव्याने बसविण्यात आलेले यंत्र तसेच पालिकेत सर्व प्रभागातील विकासकामांना लवकरच गती मिळणार असल्याची माहिती शेवटी कासकर यांनी दिली.

गोव्याच्या 60 व्या मुक्तिदिन मुरगाव नगरपालिकेच्या म्युनिसिपल स्कूलचे विद्यार्थी सुमिधा गवस हीने गोवा मुक्तीदिना विषयीआपले विचार मांडले.याप्रसंगी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका सुमेधा शिरोडकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com