Vishwajeet Rane
Vishwajeet RaneDainik Gomantak

Vishwajeet Rane : नवीन मैदानाचे उद्‌घाटन; खेळाडूंना मिळणार लाभ

पंतप्रधानांच्या विचारांनी कार्यरत
Published on

वाळपई : वाळपई येथील खेळाडूंना नव्या मैदानाचा चांगला लाभ भविष्यात होणार आहे. भविष्यात बारा कोटी खर्च करून म्हशीचे मळ-नाणूस येथे क्रीडा संकुलाचे काम हाती घेणार आहे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार हाती घेऊन कार्यरत राहणार आहे. त्यासाठी लोकांनी सहकार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

वाळपई येथे सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नगरपालिकेच्या नवीन मैदानाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात आज शनिवारी रात्री ते बोलत होते.

Vishwajeet Rane
Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीमुळे डिचोली बाजार फुलांनी बहरला

क्रीडा, वेलनेस क्लिनिकसाठी प्रयत्नशील राहणार आहे. पालिका क्षेत्रासाठी हा निधी मिळणार आहे. वाळपई सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाची इमारत दुरुस्तीसाठी कार्यवाही हाती घेतली आहे. ते काम सुरू आहे. येणाऱ्या काळात एकूण साठ कोटींचा बजेट विकासकामांसाठी केला आहे. पालिकेची वर्गवारी सी असली तरीही कामांसाठी नेहमीच कटिबध्द राहणार आहे. येणाऱ्या काळात वाळपई नगरपालिका राज्यात आदर्श बनविण्यासाठी काम करणार आहे, असे विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.

वाळपई नगरपालिका व जीसुडा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन पालिका मैदानावर केले होते. तसेच जीसुडाने वाळपई पालिकेला कचरावाहू ट्रक व जेसीबी यंत्र दिले आहे. त्याचेही उद्‌घाटन यावेळी करण्यात आले. तसेच मैदानाच्या विद्युत रोषणाईचे बटण दाबून राणेंनी उद्‌घाटन केले.

पर्येच्या आमदार दिव्या राणे, नगराध्यक्ष शेहझीन शेख, उपनगराध्यक्ष अनिल काटकर, जीसुडाचे संचालक गुरुदास पिरणकर, अभियंते हुसेन शेख मुजावर, पालिका मुख्याधिकारी सूर्याजीराव राणे, नगरसेवक रामदास शिरोडकर, माजी उपसभापती व वाळपईचे माजी आमदार नरहरी हळदणकर, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, नगरगाव जि.पं. सदस्य राजश्री काळे, समाजसेवक विनोद शिंदे, अशोक केंकरे आदींची यावेळी उपस्थिती होती. सूत्रनिवेदन किरण नार्वेकर यांनी केले. नगरसेवक प्रसन्ना गावस यांनी आभार मानले.

आदर्श नगरपालिका बनवू : गार्डन, रस्ते यांचीही बांधणी केली जाणार आहे. केंद्राकडूनही विकासासाठी निधी मिळणार आहे. अर्बन विकासतर्फे विविध कामे मार्गी लावली जाणार आहेत. वाळपई आदर्श पालिका क्षेत्र म्हणून नावारूपाला येण्यासाठी काम केले जाईल, असे विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.

सुंदर मैदान वाळपईवासीयांसाठी उपलब्ध झाले आहे. विश्वजीतनी सरकारच्या विविध खात्यांच्या माध्यमातून विकासकामांचा धडाका सुरूच ठेवला आहे. याबाबत त्यांचे कौतुकच आहे. वाळपईत ग्रामीण शहरी भागाचा विकास झाला आहे. याचा लाभ सर्वांना होणार आहे.

- डॉ. दिव्या राणे, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com