Goa Politics: सरकारची ‘एसआयटी’ म्हणजे थट्टाच !

Goa Politics: एल्विस गोम्स : राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळली; सगळीकडे अराजकता
Elvis Gomes
Elvis Gomes Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: भाजप सरकारच्‍या काळात राज्‍यात काँक्रीटचे जंगल वाढत चालले आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा सुस्‍त आहे. कळंगुटमध्‍ये खुलेआम वृक्षांची कत्तल होत असताना स्थानिक आमदार ‘ब्र’सुद्धा काढत नाही. मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याचाच अर्थ राज्यात कायदा-सुव्यवस्था उरली नसून, सर्वत्र अराजकता पसरली आहे.

Elvis Gomes
Hill Cutting: ताळगावात डोंगरकापणी केलेला परिसर पूर्ववत करा!

जमीन रुपांतरण राोखण्‍यासाठी सरकारने मध्यंतरी एसआयटी नेमली. परंतु ही एसआयटी म्हणजे थट्टाच आहे. कारण याच भाजपने खाण घोटाळ्याबाबत मोठा गाजावाजा केला, मात्र गेल्‍या दहा वर्षांत कुणाला अटक झाली का? असा सवाल काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी करून या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

म्हापशात आज आयोजित पत्रकार परिषदेत गोम्स बोलत होते. यावेळी विजय भिके, वीरेंद्र शिरोडकर, लॉरेन्स सिल्वेरा, विवेक डिसिल्वा, चंदन मांद्रेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.गोम्स म्हणाले की, खाण घोटाळ्यात शहा कमिशनने ३५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे म्हटले होते.

Elvis Gomes
Goa Politics: अधिवेशनापूर्वी आमदार अपात्रता याचिका निवाडा कठीण

परंतु, गेल्या दहा वर्षांत सरकारने काय कारवाई केली ती सांगावी. खाण घोटाळ्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती. तशाच प्रकारे जमीन रुपांतरासाठी आता एसआयटी स्‍थापन केली. परंतु ही एसआयटी म्हणजे थट्टाच आहे. प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल तसेच इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पाजंली अर्पण करण्‍यात आली.

ओडीपीच्या नावाने कळंगुटमधील झोन बदलण्यात आले. याचे परिणाम कळंगुटवासीयांना भोगावे लागत आहेत. खुलेआम वृक्षांची कत्तल सुरू असताना स्थानिक आमदार मूग गिळून गप्‍प आहेत.

- लॉरेन्स सिल्वेरा, कळंगुट काँग्रेस गटाध्यक्ष

हरमलमधील अविकसित क्षेत्रात चार मजली इमारत बेकायदा उभी राहते. याचाच अर्थ, प्रशासकीय यंत्रणा सुस्‍त आहे. अशावेळी पंचायतीपासून, टीसीपी, वीज, साबांखा हे विभाग करतात तरी काय?

- एल्विस गोम्स, काँग्रेसचे नेते

हडफडेत वृक्षांची कत्तल झाल्यानंतर दहा दिवसांनी स्थानिक आमदाराला जाग येते. त्यामुळे आमदार मायकल लोबोंच्या कृतीवर संशय उपस्थित होतो. अशाने भावी पिढीसाठी आम्ही गोवा काय राखणार?

- विजय भिके, काँग्रेसचे नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com